Nanded

कैलास येसगे यांच्या शेतकरी संवाद यात्रेस मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद.. हाणेगाव व परिसरातील शेकडो शेतकरी व तरूणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश…

कैलास येसगे यांच्या शेतकरी संवाद यात्रेस मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद.. हाणेगाव व परिसरातील शेकडो शेतकरी व तरूणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश…

नागेश इबितवार नांदेड

नांदेड : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व निराधारांच्या प्रश्नांना परखडपणे वाचा फोडून न्याय मिळवून देणारे देगलूर व नांदेडचे बच्चूभाऊ कडू म्हणून परिचित असणारे कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पीकविमा व इतर समस्यांच्या सोडवणूकीसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी व युवक संवाद यात्रेस* उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. कैलास येसगे यांचे विचार व कार्याने प्रभावित होऊन हाणेगाव, वझर, कोकलगाव परिसरातील शेकडो शेतकरी व तरूणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव व तात्काळ नुकसानभरपाई, हक्काचा पीकविमा परतावा मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्चय शेतकरी व तरूणांनी यावेळी केला.
*अपना भिडू.. बच्चूभाऊ कडू..!*
*कैलासभाऊ येसगे तुम आगे बढो.., हम सब तुम्हारे साथ है..!* अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले.
शेतकऱ्यांच्या अशा कठीण काळात कैलास येसगे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत आवाज उठवत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे भरभरून अभिनंदन, कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button