Nanded

बस्थानक येथे पाण-पोईचे उद्घांटन संपन्न

बस्थानक येथे पाण-पोईचे उद्घांटन संपन्न

बिलोली प्रतिनिधी – वैभव घाटे
बिलोली येथील बस्थानक येथे कै.व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मरणार्थ पाण पोईचे पुजन करुन उद्घांटन एस.टी महामंडळाचे आगार प्रमुख पवार व इलेक्ट्रेशन मेकॅनिक गंगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
पाणपोई ‘ म्हणजे शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.ऊन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सामाजिक जाणीव जीवंत असल्याचे लक्षण आहे.पाणपोई ‘ ही संकल्पना चांगली असून हा एक सामाजिक उपक्रम आहे. तहानलेल्या वाटसरूंना पाणी पाजणे हे एक सामाजिक काम आहे म्हणून
बिलोली येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली शहरात उन्हाळ्यात थंड पाणी पाण पोईच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत या वेळी बिलोली आगारातील कर्मचारी मुजमिल फारुखी,संतोष उत्तरवार, विजय गोपशेटवार, सुहास कुंचनवार एसटीचे कर्मचारी , प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button