Nanded

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता समाजमनाची होती _ तहसीलदार राजेश लांडगे

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता समाजमनाची होती _ तहसीलदार राजेश लांडगेनांदेड/नागेश इबितवारभोकर १८३२ सालचा काळ त्या काळामध्ये दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढून बाळशास्त्री जांभेकरांनी विविध समस्या मांडल्या, सामाजिक लेखन केले आणि समाज मनाची पत्रकारिता केली असे विचार तहसीलदार राजेश लांडगे यांनी भोकर येथे दर्पण दिनानिमित्त बोलताना मांडले.
भोकर येथे विश्राम ग्रहामध्ये ६ जानेवारी २०२२ रोजी दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार राजेश लांडगे, प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची होती, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर. पांचाळ यांनी प्रास्ताविकात बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता ते आजची पत्रकारिता यावर प्रकाश टाकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, यांच्या विचाराने आजही वाटचाल करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी करावा सत्य लिखाण करावे असे मत मांडले, यावेळी पुढे बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभा मधून लेखणीतून जनजागृती करण्यात येत होती त्याकाळी इंग्रजांविरुद्ध लिखाण करुन लोकचळवळ निर्माण झाली वाईट कृतीवर परिणाम जाणवेल असे लेखन केले जात होते आज ते विचार जपण्याची गरज आहे, पोलीस निरीक्षक विकास पाटील यावेळी बोलताना म्हणाले 190 वर्षापूर्वी जांभेकरांनी सामाजिक लिखाण करून इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला समाजाची बाजू स्वतंत्रपणे मांडली समाजासाठी लेखणी झिजवली आजची इलेक्ट्रॉनिक मीडिया ची पत्रकारिता फास्ट झाली आहे विचारपूर्वक समजून-उमजून पत्रकारिता करणे गरजेचे आहे, संपादक उत्तम बाबळे, पत्रकार बाबुराव पाटील, मनोज गीमेकर, बालाजी नारलेवाड, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन राजेश वाघमारे यांनी केले तर आभार जयभीम पाटील यांनी मानले. पत्रकार श्रीकांत देव, बी. एस. सरोदे, गंगाधर पडवळे, सुधांशू कांबळे, रमेश गंगासागरे, दत्ता बोईनवाड, सुभाष तेले, शंकर कदम, विजय मोरे, विठ्ठल सुरलेकर, शिवाजी गायकवाड, आर. के. कदम, गोविंद सूर्यवंशी, उत्तम कसबे, लतीफ शेख,शुभम नर्तावार आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button