Nanded

साठे नगर येथील महिलांनी काढले घागर मोर्चा , नगर परिषदेने घेतली दखल – एका तासात पाण्याची मोटार झाले उपलब्ध

साठे नगर येथील महिलांनी काढले घागर मोर्चा , नगर परिषदेने घेतली दखल

– एका तासात पाण्याची मोटार झाले उपलब्ध

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे
बिलोली- सतत मागणी करून देखिल बिलोली नगर परिषद प्रशासनाने पाण्यासंदर्भात उपाययोजना न केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दि 15 फेब्रुवारी रोजी नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी साठे नगर चा पाणी प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले. शहरातील साठे नगर येथे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पिण्याचे पाण्याची समस्या होत असताना याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्या मुळे महिलांना अखेर घागर मोर्चा काढावा लागला सदरिल घागर मोर्चा साठे नगर येथून बॅन्ड लावून काढण्यात आले. यावेळी महिलांनी आक्रमक होत तात्काळ साठे नगर येथे मोटार बसल्याशिवाय उठणार नाही असे पवित्र घेताच नगर परिषदेला जाग आली लगेच दोन समरसेबल मोटर उपलब्ध करून देण्यात आले. संबंधित अभियंता यांच्याशी इंद्रजीत तुडमे यांनी दोन मोटारी बसवण्याची मागणी केली होती .लवकरच बंद हात पंपावर समरसेबल बसवण्यात येईल असे सांगण्यात आले. गल्लीतील पाण्याच्या टाकिला कनेक्शन दिल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल. या वेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज,पाशा भाई गादीवाले,बाबु कुडके , ए.जी कुरेशी नागोराव जेठे, मुकिंदर कुडके ,लालु एडके, दयानंद कुडके,गंगुबाई कुडके, अनिता बाई दावलेकर,नागरबाई जेठे, देऊबाई जेठे ,चंदरबाई जेठे , राधा दा्लेकर ,धुरूबाई जेठे, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते

अजून उन्हाळ्यात देखील आलेला नाही आतापासून नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे नगरपालिकेने सर्व वार्डात जाऊन पाणीपुरवठा होत आहे का? याची पाहणी करावी , नगर परिषद याकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा येणाऱ्या काळात मोर्चा काढल्या शिवाय पर्याय नाही
– सामाजिक कार्यकर्ता इंद्रजीत तुडमे बिलोली

शहरातील देशमुख नगर सह शहरातील पाणी पुरवठा सुरळीत नाही मोटारी जळालेल्या नंतर तात्काळ दुरुस्त होत नाही . संबंधित पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळा पुर्वी पाणी टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी – सामाजिक कार्यकर्ता सय्यद रियाज ,बिलोली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button