Chalisgaon

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क.

दरेगाव ता. चाळीसगाव या मूळ गावी केले सपत्नीक मतदान…..

मनोज भोसले
चाळीसगाव — जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज आपल्या मुळ गावी दरेगाव ता. चाळीसगाव येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांचे सोबत उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई पाटील या देखील उपस्थित होत्या. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र क्रमांक तीन मध्ये येथे आज एक वाजता मतदान केले. याप्रसंगी त्यांच्या आजी सुषमाबाई पाटील, काकू
रजनीताई पाटील, बाजार समितीचे संचालक अड. राजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते उदय भाऊ पवार, गिरीश पाटील, जितेंद्र पाटील, भूषण महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली. जगात भारताची लोकशाही सर्वश्रेष्ठ असून आपले एक मत आपले हक्काचे सरकार निवडून देते.

लोकशाहीत राजा हा राजमहालात नाही तर मतपेटीतून जन्माला येतो. त्यामुळे सर्वांनी या लोकशाहीच्या मतदान रुपी उत्सवात सामील होवून आपले निर्भयपणे मतदान करावे. आणि आपले हक्काचे सरकार निवडून द्यावे. गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यासह परिसरात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मदत करीत वरुणराजाने आपले कर्तव्य निभावले. तसेच कर्तव्य मतदार राजाने निभावून निर्भयपणे मतदान करावे अशीे भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button