पंढरपूर

स्वेरीमध्ये डेंग्यू जनजागृती मोहीम संपन्न पंढरपूर नगरपरिषदेचा उपक्रम

स्वेरीमध्ये डेंग्यू जनजागृती मोहीम संपन्न
पंढरपूर नगरपरिषदेचा उपक्रम

रफिक अत्तार

पंढरपूर गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या ‘नागरी हिवताप योजना मलेरिया विभागा’तर्फे डेंग्यू रोग प्रतिबंधात्मक जनजागृतीचे आयोजन करण्यात आले.यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी चिकनगुन्या, डेंग्यू हे डासांपासून होणाऱ्या आजाराबाबत नागरिकांनी घ्यायची काळजीबाबत मार्गदर्शन केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी या ‘डेंग्यू रोग प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम’ कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक करताना ‘डेंग्यू डासापासून बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी’ बाबत मार्गदर्शन केले. पुढे बोलताना मुख्याधिकारी मानोरकर यांनी ‘एडिस ईजिप्टी’ डासाची माहिती देवून म्हणाले की, ‘घरामध्ये अथवा परिसरामध्ये पाणी अधिक दिवस साठवून ठेवू नये, पाणी साचले असल्यास त्यावर सुरक्षा जाळे लावावेत. घरामध्ये पाण्याचे साठे पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस करू नयेत तसेच रोजच्या रोज वापरात येणारी भांडी स्वच्छ करून भरावेत. घरामध्ये असणाऱ्या फ्रीज, एअर कुलर, फ्लॉवर पॉट्स, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्याचे डबे अथवा इतर वस्तू यामध्ये पाणी पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण यामध्ये चिकनगुन्या अथवा डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. घराबाहेरील परिसरात असणाऱ्या रिकामे शहाळे, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, रिकामा कुंड्या, रिकामे डबे, निकामी वाहनांचे टायर, खड्डे यामध्ये पावसाचे पाणी जास्त दिवस साठल्यामुळे त्यामध्ये चिकनगुन्या व डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. यासाठी या वस्तूचा विल्हेवाट वेळोवेळी लावावे. गच्चीवर असणाऱ्या अथवा जमिनीवर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे गच्च लावावेत. त्यामध्ये अजिबात साचत ठेवू नये अन्यथा त्यामध्ये डास जाऊन डासोत्पत्ती होऊ शकते. पाणी साठवण्याचे ड्रम, बॅरल इत्यादी दर सात दिवसांनी धुऊन स्वच्छ व कोरडे करावेत व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणी साठवण्याचे मोठे साठे, टाक्या असल्यास त्याची तपासणी आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे करून घ्यावेत. याची उत्पत्ती स्थाने निर्माण न केल्यास डास देखील निर्माण होणार नाहीत व त्यामुळे चिकनगुन्या, डेंग्यू व मलेरिया असे आजार होणार नाहीत. सेफ्टी टँक व्हेट पाइपला वरच्या बाजूला नायलॉन जाळी बसवून घेणे. तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अशी काळजी घेतल्यास चिकनगुन्या डेंग्यू व तापाचा प्रसार आपल्या शहरामध्ये होणार नाही. यासाठी सर्व नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावेत.’ असे सांगून अनेक उपयुक्त माहिती देऊन आपल्या घरात व परिसरात पाणी साठवू नये. यासाठी काळजी घेण्याचे आवाहनही मुख्याधिकारी मानोरकर यांनी केले. यावेळी न.पा.चे आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकरी व आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांच्यासह डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, स्वेरीचे प्राध्यापकवर्ग, अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते तर स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीमध्ये पंढरपूर नगरपालिकेतर्फे डेंग्यू रोग प्रतिबंधात्मक जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर सोबत आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकरी, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, डिप्लोमा इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button