पंढरपूर

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. करण पाटील यांचा स्वेरीत सत्कार

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. करण पाटील यांचा स्वेरीत सत्कार

प्रतिनिधी ( रफिक आतार)

पंढरपूर -पंढरपुरच्या समीक्षा पब्लिकेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल स्वेरीच्या एम. बी. ए. विभागाचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांचा स्वेरीच्यावतीने संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंढरपूरचे विश्वविक्रमवीर कवी रवी सोनार यांच्या हस्ते आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह राज्यातील कला व साहित्य क्षेत्रातील नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीत स्वेरीच्या एम. बी. ए. विभागाचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नुकताच पंढरपुरच्या ‘विठ्ठल इन’ सभागृहात प्रदान करण्यात आला. प्रा करण पाटील हे श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील एम.बी.ए. विभागाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक विभागात उलेखनीय कामगिरी केली आहे. ‘पालवी’ संकुलातील चिमुकली मुले असो ‘कुष्टरोग्यांची वसाहत’ असो अथवा गोपाळपुरातील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ असो यातील चिमुकल्यांच्या, आजारी नागरिकांच्या आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद फुलविण्याचे कार्य केले. ही बाब लक्षवेधी ठरली. त्यामुळे समीक्षा पब्लीकेशनचे प्रकाशक प्रविण भाकरे व त्यांच्या निवड समितीतून स्वेरीच्या प्रा. पाटील यांचे नाव अग्रक्रमावर आले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रा. करण पाटील यांना पुरस्कार मिळाल्यामुळे स्वेरीच्यावतीने बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांच्या हस्ते प्रा करण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, समिक्ष पब्लिकेशनचे प्रकाशक प्रविण भाकरे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी प्रा. करण पाटील यांचे अभिनंदन केले.

छायाचित्र-स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या एम.बी.ए. विभागाचे विभागप्रमुख पुरस्कारप्राप्त प्रा. करण पाटील यांना समीक्षा पब्लिकेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल स्वेरीच्यावतीने प्रा. पाटील यांचा सत्कार करताना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल सोबत डावीकडून प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button