Pandharpur

?️राजकारण…सुसंस्कृत राजकारणाचा, सुशिक्षित चेहरा – श्रीकांत चव्हाण सर

सुसंस्कृत राजकारणाचा, सुशिक्षित चेहरा – श्रीकांत चव्हाण सर

प्रतिनिधी रफीक आत्तार

भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.आपल्या युवकांचा जोश, इच्छाशक्ती,कार्यतत्परता, समाजाप्रती असलेली जाणीव आणि नसानसांत भिनलेला स्वाभिमान हाच देशाचा खरा आधार आहे.असाच आज पंढरपुर तालुक्यातील सुस्ते या छोट्याशा गावातील श्री.एस.के.चव्हाण एक अष्टपैलू तरूण महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पदवीधरांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे.

सर्वसामान्य घरातील तरूण, प्राथमिक शिक्षण सुस्ते येथेच झाले.त्यानंतर उच्चशिक्षण हे पंढरपुर येथील नामांकित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे तर उर्वरित शिक्षण हे कोल्हापूर येथे झाले.वडील आणि चुलते हे शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक समृद्धीचा वारसा हा जन्मजात अंगी भिनलेला.त्यामुळेच शिक्षण पुर्ण झाल्यावर शैक्षणिक व्यवसायात उतरुन शिक्षकी पेशा स्वीकारला.वेगवेगळ्या खेड्यातील, गावातील, तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन केले.आणि शिक्षकांच्या या चाकोरीबद्ध आयुष्यात अनेक व्यक्ती, विद्यार्थी, अधिकारी, पुढारी व समाजसेवक घडवून शिक्षकी पेशाला खर्या अर्थाने पुर्णत्व प्राप्त करून दिले.शेकडो गरीब विद्यार्थ्यांचा मायबाप, सर्वसामान्य युवकांचा आदर्श तर आबालवृद्धांचा आधार म्हणून आज श्रीकांत चव्हाण सर यांच्याकडे पाहिले जाते.
खरं सांगायचं तर सरांना फक्त शिक्षक म्हणून पाहणं हा त्यांच्या व्यक्तिरेखेचा कमीपणा ठरेल…कारण हा व्यक्ती एका यशस्वी शिक्षका बरोबरच तगडा राजकारणी, यशस्वी उद्योजक, संवेदनशील समाजसेवक, मुत्सद्दी कलाप्रेमी आणि एक आदर्श मार्गदर्शक आहे. सरांचं आवडते वाक्य आहे “I Get, What I Want” म्हणजे ‘मला जे हवं ते मी मिळवतोच’.आणि या उक्तीप्रमाणे खरोखरच सर जे ठरवतात ते करतातच.! श्रीकांत सर हे शिक्षण क्षेत्रातील नेपोलियन आहेत.यांना गणितात हरवणं अवघड नव्हे तर अशक्य आहे. म्हणूनच आम्हाला खात्री आहे की राजकारणातील मतांची गणित ही सरांना पदवीधरांचा आमदार होण्यापासून रोखू शकत नाहीत.चव्हाण सर यांचे सामाजिक कार्य सुद्धा तितके कौतुकास्पद आहे सामाजिक कार्य करत असताना गोरगरिबांना मदत करणे, अडचणीत असणाऱ्या व्यक्ती साठी धावून जाणे ही त्यांची वृत्ती आहे. मग तो करण्याचा काळ असो किंवा महापूर आलेला असो किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज असो अशा वेळेला श्री चव्हाण सर हे या सर्वांच्या मदतीला धावून जातात आजपर्यंत त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. या माणसाने हजारो विद्यार्थी घडवले आहेत.एका हाकेवर धाऊन येणारी हजारो जिवाला जीव देणारी माणसं मिळवली आहेत.

आज पुणे पदवीधर मतदार संघातून अनेक मातब्बर नेत्यांची नावे पुढे येत आहेत.पण सर्वसामान्य कुटुंबातील , जनमानसांच्या मनातील, शेतकर्यांच्या, रानातील, विद्यार्थ्यांच्या हक्काचा आणि पदवीधरांच्या अस्मितेचा आवाज म्हणून श्रीकांत चव्हाण सरांचा बोलबाला सर्वत्र सुरू आहे.घराणेशाहीच्या राजकारणाला फाटा देत, पैशाच्या माजलेल्या गवताला लोकशाहीच्या नांगराखाली दाबत हा शेतकऱ्यांचा पोरगा आणि पदवीधरांचा आवाज विधानपरिषदेत पोहोचणार यात तीळमात्र शंका नाही.कारण ही लढाई पैशावर किंवा बापजाद्याच्या नावावर नाही तर शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी आणि पदवीधरांच्या जीवावर लढवणारा पांडुरंगाचा वारकरी हा कधीच हार मानत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button