पंढरपूर

संशोधनासाठी कार्यशाळेची गरज – अनिरुद्ध कुलकर्णी

संशोधनासाठी कार्यशाळेची गरज – अनिरुद्ध कुलकर्णी
स्वेरीमध्ये एस.टी.टी.पी. कार्यशाळेचे उदघाटन
प्रतिनिधी
(रफीक आत्तार)

पंढरपूर– ‘आपल्या दैनंदिन जीवनात अँटिना आणि त्याच्याशी संबंधित विविध विभाग हे खूप महत्वाचे असून या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अद्ययावत सुविधामध्ये काम करावे लागते. अँटेना प्रोजेक्टमध्ये सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय कार्य संशोधन अंतर्गत अँटिना या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यांची संख्या मात्र खूप कमी आहे. या तुलनेत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूरमध्ये चालू असणारे या क्षेत्रातील संशोधन संबंधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या कार्यशाळा माध्यमांतील सुविधांचा वापर करून भविष्यात अँटेना क्षेत्रात उत्तम संशोधन कार्य करता येवू शकते म्हणून संशोधनासाठी कार्यशाळेची गरज असते. ’असे प्रतिपादन पुण्यातील आर. एफ. सोल्युशन्सचे रेडीओ फ्रिक्वेन्सी (आर.एफ.) डीझाईन इंजिनिअर अनिरुद्ध कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात आयोजिलेल्या आणि आठवडाभर चालणाऱ्या ‘शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम (एस.टी. टी.पी.)’ च्या उदघाटन प्रसंगी अभियंता अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात कार्यशाळेचे समन्वयक प्रा. महेश मठपती यांनी एस. टी. टी. पी. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देवून ही कार्यशाळा आयोजिन्याचा हेतू सांगितला. ए. आय. सी. टी. ई. कडून मॉडरॉब अंतर्गत मिळालेल्या निधीतून स्वेरी इंजिनीअरींगच्या ई.अँड टी.सी. विभागाने मायक्रोवेव लॅब अद्ययावत करण्यात आली आहे.त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व संशोधकांना व्हावा ह्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलताना अभियंता कुलकर्णी यांनी उपलब्ध असणाऱ्या सुविधा वेक्‍टर नेटवर्क अॅनालायझर (२० गिगा हर्ट्झ क्षमतेचे), कॅड फेको सॉफ्टवेअर आणि पीसीबी प्रोटोटाइप मशीन याबाबत माहीती दिली. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन क्षेत्रातील होत असलेली प्रगती बाबत मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा आठवडाभर चालणार असून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामवंत संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे पदवी व पदविकेचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. नीता कुलकर्णी यांनी केले तर आभार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांनी मानले.
छायाचित्र-स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्रामचे उदघाटन करताना अनिरुद्ध कुलकर्णी रेडीओ फ्रिक्वेन्सी (आर.एफ.) डीझाईन इंजिनिअर अनिरुद्ध कुलकर्णी सोबत डावीकडून कार्यशाळेचे समन्वयक प्रा. महेश मठपती, विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button