पंढरपूर

पंढरी नगरीतील तीन सावकारवर गुन्हा दाखल

पंढरी नगरीतील तीन सावकारवर गुन्हा दाखल

प्रतिनिधि रफिक आतार

पंढरपूर- तीर्थक्षेत्र पंढरीच्या नावास कलंक असलेली येथील दहा टक्क्यांची पाशवी सावकारकी उशीरा का होईना कायद्याच्या कचाट्यात सापडू लागली आहे. पोलिसांच्या प्रयत्नामुळे अशा तीन सावकारावर गुन्हे दाखल झाले आहेत.

सचिन अभंगराव, बाळू गोटेकर, आणि विठ्ठल धायगुडे या तिघांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे. येथील गोपाऴ रामलिंग शिंदे वय ३७ रा. शिवलिंग महाराज धर्मशाळा, स्टेशन रोड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे शहरातील सावकार वर्गात खळबळ उडाली आहे. तसेच या तक्रारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर शहरामध्ये इस्त्री कामाचा व्यवसाय करणाऱ्या गोपाळ शिंदे या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने सचिन अभंगराव, बाळू

गोटेकर, आणि विठ्ठल धायगुडे यांचेकडून अनुक्रमे दहा, वीस आणि पंधरा हजार रूपये दरमहा दहा टक्के व्याजदराने घेतले होते. या तिघांना यातील २७ हजार रपये परत केले होते. या व्यवहारापोटि आणखी १ लाख ७ हजार रूपयाची मागणी या तिघांकडून गोपाळ यास होत होती. ही रक्कम दे नाही तर उचलून नेईन अशा धमक्या त्यास दिल्या जात होत्या.

चौकट

पंढरपूर शहरातील सावकारी मुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक तरूण आजही भीतीपोटी जिल्ह्याबाहेर जीवन जगत आहेत तर सावकार मालामाल होउन राजकीय वजन वाढवून पदे भोगत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी नागरीकांना दिलेल्या विश्वासामुळे सावकारी पाशात अडकलेले नागरीक पुढे येऊ लागले आहेत.

चौकट

*तर एकही सावकार सुटणार नाही*

पोलिस निरीक्षक दयानंद गावडे याची धडाकेबाज कामगिरी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांची कर्तव्यदक्षता काही महिन्यापासून नागरिक अनुभवत आहेत. गुन्हेगारी जगतातील प्रत्येक घटकाची नाकाबंदी होत आहे. सावकारीने पिडित नागरीकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. कवडे यानी केले होते. परंतु येथील सावकारांच्या दहशतीपूढे कोण पुढे येईल असे वाटत नसताना, एक गुन्हा दाखल झाला, हे केवळ पोलीस प्रशासनावर निर्माण झालेल्या विश्वासामुळेच. सावकार पीडित नागरिकांचा हा विश्वास असाच राहिल्यास आणि पोलिस प्रशासन नागरिकांना आपले वाटू लागल्यास शहरातील एकही सावकार बाहेर राहणार नाही, तर अनेकाचे खोटे मुखवटेही गळून पडल्याशिवाय राहणार नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button