Parola

दबापिंप्रीत गावठी दारू अड्यांवर धाड

दबापिंप्रीत गावठी दारू अड्यांवर धाड

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा तालुक्यातील असलेले दबपिंप्री येथिल गावठी दारू अड्यांवर आज पारोळा पोलिसांनी धाड टाकून शेकडो लिटर कच्चा माल हस्तगत केली पारोळा तालुक्यातील हि पहिलीच घटना असावी कि दारूचा एवढा कच्चा माल हस्तगत करण्यात आला यावेळी दबापिंप्री येथिल जागृत तरूणांनी पुढाकार घेऊन याबाबतची माहिती पारोळा पोलिसांनी कळविली आणि पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांनी धाड टाकली उपस्थिती तरूणांनी जंगलात जाऊन सर्व कच्च्या मालाचे ठिकाणे पोलिसांना नेवून दाखवली यावेळी शेकडो लिटर कच्चा माल हस्तगत करण्यात आला यावेळी सर्व कच्चा माल जागेवरच नष्ट करण्यात आला आणि मिळालेले सर्व साहित्याचे जागेवर पेटवून देवून तेहि नष्ट करण्यात आले यावेळी सरपंच प्रमिलाबाई भिल, उपसरपंच सुरेश पाटील, ग्राप सदस्य विजय पाटील, दबापिंप्री पोलिस पाटील प्रकाश भागवत,रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील ,होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव, प्रविण पाटील, पो.कॉ.सुनिल वानखेडे,विजय भोई , होमगार्ड नरेंद्र पाटील, नरेंद्र बोरसे , भारत पाटील, पत्रकार रामचंद्र पाटील, मयुर पाटील, किशोर वाघ दबापिंप्री येथिल तरूण उपस्थित होते या सर्व परीस्थिती ची पारोळा पोलिसांनी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे हि सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button