Aurangabad

श्रीमती एन.एन.सी. महाविद्यालय कुसुंबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

श्रीमती एन.एन.सी. महाविद्यालय कुसुंबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा ता.जि.धुळे.येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या 132 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. एम. जी. कासार होते. रा.से. यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.बी.गायकवाड, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. मोरे, प्रा. तृप्ती रामटेके,डॉ.एस. एस.खरात, मेहतर सर, गावित सर, कार्यालयीन अधीक्षक एस.ए. चौधरी श्री.हेमराज चौधरी.आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी डाॅ.एम.जी.कासार यांचे व्याख्यान संपन्न झाले.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही राष्ट्रासाठी दिपस्तंभ आहेत.ते विश्वरत्न होते. घटनेचे शिल्पकार,दलितांचे उद्धारक,मूकनायक, महान राष्ट्रभक्त होते असे सांगून बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर त्यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.बी.गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. व्ही.एस.मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button