Latur

?️ अन भिक्षा मागणे सोडून तो कष्ट करू लागला ! 【 दिव्यांग】 ओमशिवा स्वामीची संघर्ष मय जीवन गाथा

..अन भिक्षा मागणे सोडून तो कष्ट करू लागला !
【 दिव्यांग】
ओमशिवा स्वामीची संघर्ष मय जीवन गाथा
लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची उपासमारलातूर – जीवन संघर्षाच्या वाटचालित परिस्थिती माणसाला घडवत असते. बिकट परिस्थितीशी दोन हात करून अनेकजण आपल्या जगण्याचा मार्ग सुकर करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे लातुरच्या पाखरसांगवी येथील कोपरापासून एक हात नसलेले ओमशिवा कार्तिक स्वामी. त्यांनी भिक्षा मागायचे काम सोडून आयकार्डचे कव्हर, उजळनीचीपुस्तके विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आज कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये त्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांचे कुटुंब दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे.
आशा गरजवंताला खऱ्या मदतीची गरज असून संस्था व शासनाने तात्काळ मदत करणे काळाची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button