Aurangabad

विहामांडवा येथे 202 लिटर हातभट्टी दारु जप्त

विहामांडवा येथे 202 लिटर हातभट्टी दारु जप्त

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : आज रोजी सकाळी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की विहामंडवा येथे मोठ्या प्रमाणात वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू तयार झाली असून विक्री करत आहेत. बातमीची खात्री करून स.पो.नि. सुरवसे साहेबां सोबत पी.एस.आय सुतले, पी.एस.आय खराड, पो.हे.का. मोहिते, सहाय्यक फौजदार मदने पो.हे.का. आव्हाड, पो.हे.का. उबाळे. पो.ना माळी, पो.ना सुलाने, पो.ना नांदवे, पो.ना फोलने ,पो.का पवन चव्हाण, पो.का पवार, पो.का गोपालघरे पो.का धनवे, पो.का काकडे, पो.का पगारे, महिला पो.का राठोड. अंमलदार यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून छापा मारला असता, आरोपी संदीप डुकले यांच्या घरातून 52 लिटर हातभट्टी दारू. कल्याण देवराव गायकवाड यांच्या घरातून 30 लिटर हातभट्टी दारू. आण्णा उत्तम गुंजाळ यांच्या घरातून 95 लिटर हातभट्टी दारू. तसेच सविता दत्तू माळी यांच्या घरातून 25 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. एकूण 202 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, अंदाजे 20200 रुपयेची दारू जप्त करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पी.एस.आय सुतले हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button