Aurangabad

बाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार; दोन दिवसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल

बाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार; दोन दिवसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : बाळाला जन्म दिल्यावर अवघ्या 24 तासांत जन्मदाती आई बाळाला सोडून पसार झाली आहे. घाटी रुग्णालयातून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत घाटी प्रशासनाने तक्रार देण्यास उशीर केल्याने अखेर बेगमपुरा पोलिस ठाण्यात पसार झालेल्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, 29 ऑगस्ट रोजी गर्भवती महिला घाटीच्या प्रसुती विभागात दाखल झाली होती. 30 ऑगस्ट रोजी तिने एका मुलाला जन्म दिला, त्यानंतर 24 तास उपचारही घेतले. मात्र त्या महिलेने 30 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अचानक रुग्णालयातून पोबारा केला. सुरक्षारक्षकांनी परिसरात महिलेचा बराच वेळ शोध घेतला परंतु ती आई कुठेही दिसून आली नसल्याने अखेर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी देखील त्या आईचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्या प्रकरणात तक्रार द्यायची कोणी यावर निर्णय न झाल्याने अखेर दोन दिवसांनी घाटीचे निवासी डॉक्टर प्रविण सुखदेवे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात पसार झालेल्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button