Aurangabad

मुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

मुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडीत भाजीपाला आणण्यासाठी जात असताना रस्त्यावर खेळत असलेल्या आपल्या पाच वर्षांच्या मुलीवर लक्ष ठेवण्यास आईने घराबाहेर बसलेल्या 17 वर्षांच्या तरुणास सांगितले. ज्या तरुणाला लक्ष ठेवायला सांगितले. त्याच तरुणाने मुलीला घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी हद्दीतील एका ठिकाणी पीडित मुलीची आई व इतर तीन महिला सोबत भाजीपाला आणण्यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता परिसरातील बाजारात जात होत्या.

पीडितेसोबत तिच्याच वयाचा शेजाऱ्याचा एक मुलगा खेळत होता. दोघेही लहान असल्यामुळे पीडितेच्या आईने बाहेर मोबाईल बघत बसलेल्या तरुणास आपल्या लहान मुलीकडे लक्ष देण्यास सांगितले. आम्ही तासाभरात परत येत असल्याचेही कळविले. घराशेजारी कोणी नसल्याचा फायदा घेत सदर तरुणाने मुलीच्याच घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीच्या वडिलांना घटना समजल्यानंतर रविवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button