Aurangabad

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत अशातच इलेक्ट्रिक मोटर च्या सहाय्याने घरगुती गॅस व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरून विकणाऱ्या दर्गा रोड तसेच वळदगाव शिवारातील काही जणांविरुद्ध गुन्हे शाखा तसेच पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या वेळी पाच लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल संबंधित पथकाने जप्त केला आहे.

शहरातील शहानुर मियां दर्गा रोड परिसरात नाल्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस चा वापर इलेक्ट्रॉनिक मोटर च्या सहाय्याने व्यवसायिक सिलेंडर मध्ये होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या परवानगीने पुरवठा निरीक्षकांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा मारला. या छाप्यात तब्बल 103 सिलेंडर सापडले असून, यात विविध कंपन्यांच्या सिलेंडरचा समावेश होता. या कारवाईत 3 लाख 63 हजार 950 रुपयांच्या मुद्देमालासह शेख मुख्तार शेख उस्मान (रा. पीरबाजार) याच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button