Parola

महाराष्ट्र शासनाची खावटी अनुदान योजना ठरतेय आदिवासीं बांधवांना आधार…

महाराष्ट्र शासनाची खावटी अनुदान योजना ठरतेय आदिवासीं बांधवांना आधार…

पारोळा : आदिवासी खावटी अनुदान योजना द्वारे 2000/- इतके अनुदान लाभार्थांचे खात्यात थेट जमा व उर्वरित अंदाजे रु.2000/- चे अन्नधान्य,कडधान्य व जीवनावश्य वस्तुची किट आदिवासी विभागातील पात्र लाभर्थांना देण्यात येत आहे. आज महाळपुर ता. पारोळा येथिल आदिवासी समाज बांधवांना, खा.अ.ग्रामसचिव दरबारसिंग देयसिंग गिरासे व अ.भा.आदिवासी विकास परिषदचे जिल्हा महाचिव सागर रमेश पारधी, व आदिवासी आश्रम शाळा बोळे तांडांचे सर्व कर्मचारी यांच्या हस्ते आदिवासी आश्रम शाळेत ,महाळपुर येथिल आदिवासी समाज बांधवांना पात्र लाभार्थींना खावटी अनुदान योजनेचा जीवनावश्यक वस्तुची किट देण्यात आली.

संबंधित लेख

Back to top button