चिमूर,चंद्रपूर

चिमुरातील चावडी परिसरातील काकड आरती चे सात दशक पूर्ण

चिमुरातील चावडी परिसरातील काकड आरती चे सात दशक पूर्ण

12 नोव्हेंबर ला होणार तुलसी विवाह
72 वर्ष पूर्ण हिरक जयंती कडे वाटचाल

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
येथील चावडी परिसरातील हनुमान मंदिर येथे सर्व प्रथम सण 1947 साली वं.ब्र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हस्ते काकड आरतीची सुरूवात झाली, या मंदिरात दरवर्षी अश्विन पौर्णिमेपासून काकडआरतीची सुरुवात होते, ही काकडआरती स्व. लक्ष्मणराव हिंगणकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली ,त्यांचे निर्वाणानंतर त्यांचे वारस स्व. पुंडलिक हिंगणकर व दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेले शेषराव महाराज हिंगणकर यांनी काकड आरतीचा वसा सामोर नेत मागील 60 वर्षांपासून से.नि. जि प मुख्याध्यापक हरिश्चंद्र हिंगणकर गुरुजी यांनी काकड आरती अविरत सुरू ठेवली आहे,या काकड आरतीला वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिमूर मुक्कामी असल्यास आवर्जून हजर राहत होते, यावर्षी 72 वर्षे पूर्ण होत आहेत.
सर्वप्रथम रोज ग्रामसफाई करून पहाटे 4 वाजता स्नान करून मंगलमय वातावरणात चिमूर शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात, यावेळी सर्वप्रथम हरिपाठ, भूपाळी व काकडआरती व सत्संग नित्य नियमाने करण्यात येते, यावेळी भाविकांना अल्पोपहार देण्यात येतो, रोज सायंकाळी ह भ प सुरेश बंडे महाराज यांचे मार्गदर्शनात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात
अश्विन पौर्णिमेपासून सूरू झालेल्या काकड आरतीची सांगता कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तुलसी विवाह करून करण्यात येते,यात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंडे यांचे कडून महाप्रसादाचे वितरण केले जाते, गेल्या 72 वर्षांपासून सुरू असलेली चावडी परिसरातील हनुमान मंदिरावरील काकड आरती ची परंपरा खंडित होऊ नये याकरिता चावडी परिसरातील हरिश्चंद्र हिंगणकर गुरुजी, सुरेश बंडे महाराज, नत्थू बंडे, नीलकंठ बंडे,दौलत बंडे, निशिकांत बंडे ,पुरुषोत्तम बंडे,योगेश अगडे, अंकुश बगवे, मंगेश मेरुगवार, ईश्वर बंडे आदी कार्यकर्ते दरवर्षी पुढाकार घेताना दिसतात
72 वर्षे पूर्ण झालेल्या या काकड आरती मंडळाने पुढील वर्षी आरती झाल्या नंतर वार्डात रक्तदान शिबिर, समाजप्रबोधन कार्यक्रम, भजन, स्वछता अभियान असे विविध कार्यक्रमांचे नियोजन करावे अशी चिमुरकरांची अपेक्षा आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button