पंढरपूर

वनखात्याने विठ्ठल मंदिराला दिले कानोपात्रा चे रोप

वनखात्याने विठ्ठल मंदिराला दिले कानोपात्रा चे रोप

पंढरपूर (प्रतिनिधी):- रफिक अत्तार

विठ्ठल मंदिरामध्ये तरटी दरवाजा जवळ असलेले कानोपात्रा (तरटी)चे झाड बऱ्याच वर्षापासून बहरत नसल्याने त्याठिकाणी नवीन कान्होपात्राचे रोप कासेगाव येथे वन विभागाचे रोपवाटिकेत तयार करून वनविभागाचे अधिकारी व्ही एन पवळे यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे एकादशीच्या मुहूर्तावर सुपूर्द केले.
विठ्ठल मंदिरातील व्यंकटेश मंदिरासमोर कानोपात्रा म्हणजेच तरटी चे रोप कासेगाव येथील रोपवाटिकेत तयार करण्यात आले होते. आजच्या एकादशीच्या मुहूर्तावर तयार केलेले कान्होपात्राचे रोप मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द केले कानोपात्रा च्या झाडाचे पान आपल्याजवळ असावेत किंवा दर्शनाला आलेले भाविक कान्होपात्रा च्या झाडाची पाने तोडून घरी घेऊन जातात तेथील कानोपात्रा चे झाड वाळून गेले आहे त्याठिकाणी नवीन कान्होपात्राचे रोप लावण्यासाठी वनविभागाचे वनाधिकारी व्ही एन पवळे यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक यांच्याकडे दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button