Nanded

७५ स्वातंत्र्यदिनानिमित्त अंजनी येथे शेतकरी प्रकल्प संपन्न

७५ स्वातंत्र्यदिनानिमित्त अंजनी येथे शेतकरी प्रकल्प संपन्न

बिलोली /नागेश इबितवार

15 ऑगस्ट 2021 रोजी मौ. अंजनी येथे कृषी महाविद्यालय नायगाव (बा.) अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य मार्गदर्शक हर्षद दिगंबर पाटील (पारवेकर) यांनी माती परीक्षण,शेणखत गांडूळ खत तसेच सेंद्रिय शेती यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी याचे मोलाचे मार्गदर्शन केले दिवसेंदिवस आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त शेतामध्ये रासायनिक औषधांचा वापर करणे होय यामुळे माती वर होणारे परिणाम उत्पन्नात होणारी घट याचे मुख्य कारण होय तसेच माती परीक्षण ही एक काळाची गरज आहे हे जाणून शेतकऱ्यांनी माती परीक्षण केंद्र मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करून घ्यावे यामुळे मातीचा PH (सामू) तसेच सेंद्रिय कर्ब याची पुरेपूर माहिती आपल्याला मिळेल व त्या पद्धतीने मातीला लागणारी पोषक तत्त्व आपण सेंद्रिय पद्धतीने देऊ शकतो. तसेच शेती हा एक पूरक व्यवसाय आहे यामध्ये आपण विविध प्रकारचे योजना आखून शेळी पालन ,मत्स्य पालन, शेततळे इ. यापासून भरपूर प्रमाणात पैसा कमवू शकतो असे त्यांनी आवाहन केले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजनी गावचे सरपंच महेश पाटील हांडे, शिवराज पाटील,हांडे गोविंद बद्देवाड तसेच कृषी महाविद्यालय नायगांव चे विद्यार्थी दिपक कांबळे अनिकेत दंडे ,स्वप्नील शिवराज हांडे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते…

संबंधित लेख

Back to top button