Amalner

अमळनेरचे शिक्षण महर्षी आबासो .व .ता पाटील यांचे निधन

अमळनेरचे शिक्षण महर्षी आबासो .व .ता पाटील यांचे निधन

रजनीकांत पाटील

अमळनेर -प्रतिनिधी अमळनेरचे शिक्षण महर्षी वसंतराव तानकू पाटील उर्फ व .ता आबा पाटील (७१) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.
ते धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय विकास समितीचे ते चेअरमन होते.तसेच दैनिक पुण्यप्रताप चे ते मुख्य संपादक होते. बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता त्यांनी अनेक संस्थाही उभारल्या व ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत त्यांच्या या कार्यामुळे त्यांची शिक्षणमहर्षी म्हणून ओळख निर्माण झाली.

आबासाहेब व. ता. पाटील यांनी सतत 30 दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. आज दि.२७/०८/२०२० वार-गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यावर नाशिक येथे गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते .उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले, एक मुलगी ,जावई, सुना, नातवंडे असा गोतावळा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button