Parola

बाहुटे ता.पारोळा येथील आशा स्वयंसेविकेला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची संघटनेची मागणी

बाहुटे ता.पारोळा येथील आशा स्वयंसेविकेला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची संघटनेची मागणी

पारोळा : दि.२७.०८.२०२१ रोजी बाहुटे ता.पारोळा येथे कोव्हिड-१९ च्या लसीकरण सत्रा दरम्यान कर्तव्यावर असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती सुनिता नाना पाटील यांना गावातीलच भावेश पाटील, कल्पेश पाटील आणि श्रीमती मनीषा पाटील यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.श्रीमती सुनिता पाटील यांना मारहाण करणाऱ्या वरील समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.गणेश भांडारे यांची भेट घेऊन केली.पोलिस निरिक्षक श्री.भांडारे यांनी लागलीच गुन्हा दाखल करण्याचे ठाणे अंमलदार यांना आदेश दिले. हे संघटनेचे यश असून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या एक जुटिचा विजय आहे असे रामकृष्ण पाटील यांनी उपस्थित आशा स्वयंसेविकांना सांगितले.
शिष्टमंडळात अनिता पाटील, मनिषा बडगुजर,सुनिता पाटील,रविशा मोरे,भारती सुर्यवंशी,सुनिता पाटील,नेतल राठोड, कविता राजपूत,मनिषा पाटील,विजया पाटील,रंजना पाटील,भारती पाटील यांच्यासह अन्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button