Jalgaon

?जळगांव Live..10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत  संचारबंदी लागू.. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आदेश…

?जळगांव Live..10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू..
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आदेश…

जळगाव: गेल्या काही दिवसांत कोविड -19 विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

दिनांक 07/03/2021 पासून दिनांक 15/03/2021 पावेतो खालील प्रमाणे आदेश

1 ) सर्व प्रकारच्या शाळा , महाविद्यालये , विद्यापीठ , शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र , खाजगी शिकवणी क्लासेस , सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील . तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल . तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई – माहिती तयार करणे , उत्तरपत्रिका तपासणी करणे , निकाल घोषित करणे , ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा / महाविद्यालयात उपस्थित रहावे .

2 ) इयत्ता 10 वी , इयत्ता 12 वी व महाविद्यालयीन स्तरावरील परिक्षांच्या पार्श्वभूमीवर सदरचे वर्ग सुरु करण्याबाबत या कार्यालयाकडून जळगांव जिल्हयातील कोविड -19 बाधित रुग्ण संख्या विचारात घेऊन त्या त्या वेळेस नव्याने आदेश निर्गमित करण्यात येतील .

3 ) अभ्यासिका ( लायब्ररी , वाचनालये ) या केवळ 50 % क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील .

4 ) कोविड -19 नियमावलींचे पालन करुन सर्व प्रकारच्या परिक्षा , चाचण्या घेता येतील ,

5 ) सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , उरुस , दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी राहील .

6 ) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 10 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा – अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील .

7 ) सर्व प्रकारचे सिनेमागृहे , नाट्यगृहे , व्यायामशाळा , जलतरण तलाव , बगीचे , मनोरंजन पार्क्स , प्रेक्षक गृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील .

8 ) सर्व प्रकारचे सामाजिक , राजकीय , मनोरंजनात्मक , शैक्षणिक , सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी राहीन . तसेच सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा , प्रदर्शने , मेळावे , संमेलने यांना बंदी राहील .

9 ) सर्व आठवडे बाजार बंद राहतील .

10 ) कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील . ( तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील . ) मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहील .

11 ) लग्न समारंभ , कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या निबंधांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील . कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही , याची संबंधितांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी .

12 ) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा – यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे , त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग , मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील . तसेच कोविड -19 ची लक्षणे दिसून येणा – या संशयित कर्मचा – यांची कोविड -19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील .

13 ) जळगांव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता , सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे , सर्व व्यक्तींनी चेह – यावर मास्क लावणे , सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे तसेच सॅनिटाईजरचा वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव , कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील . सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल . सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे , कोणत्याही रिटेलर्स ( किरकोळ व्यापारी ) यांना प्रवेश असणार नाही . तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , जळगांव व सर्व सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधित बाजार समितीच्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन कोविड -19 नियमावलीचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी .

14 ) संपूर्ण जळगांव जिल्हयात रात्री 10.00 वाजेपासून सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी ( Night Curfew ) घोषित करण्यात येत आहे . मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना , अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक , संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार ( तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील ) , बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील . मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल . तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा . पेट्रोलपंप , गॅरेजेस यांना देखील सूट राहील .

15 ) गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने , मोचें , रॅली यांना बंदी राहील . मात्र केवळ 5 लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल . सदरचा आदेश हा सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी पारीत करण्यात येत आहे . सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता , 1860 ( 45 ) चे कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता , 1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील . असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button