Chalisgaon

हिरापूर येथील रेल्वे पूल भुयारी मार्गाचे काम व्हावे:खासदार उन्मेश पाटील यांना समन्वय समितीतर्फे निवेदन

हिरापूर येथील रेल्वे पूल भुयारी मार्गाचे काम व्हावे:खासदार उन्मेश पाटील यांना समन्वय समितीतर्फे निवेदन


प्रतिनिधी :


चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील हिरापुर येथे रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्गाच पंचक्रोशीतील हिरापुर, ब्राम्हणशेवगे, माळशेवगे, पिंपळवाड,अंधारी, तमगव्हाण, हातगाव,शेवरी, नाईकनगर इ.गावांचा एकमेव रहदारी मार्ग आहे.गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने याठिकाणी लोखंडी पाईप लाऊन जड वाहतूक बंद केलेली आहे. रेल्वे पुलाखालून यामुळे एस.टी.बसेस ही जात नाही. भुयारी मार्गाची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे.या गावांना या पुलाखालून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे पावसाळ्यात तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात. पंचक्रोशीतील बरेच शालेय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी चाळीसगाव येथे ये जा करत असतात. एसटी बससेवा यामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोस्टाच्या गाड्याही यामुळे बंद झाल्याने त्या यंत्रणेवरही विपरीत परिणाम झाला आहे. तसेच वैद्यकिय उपचारासाठी वेळेवर जाता येत नाही. अँब्यूलन्स सेवा ही यामुळे वेळेवर मिळत नाही. स्वस्त धान्य पुरवठा करणारे वाहन असो की शेतीमाल वाहणे या भुयारी मार्गाने आणता येत नसल्याने
या भुयारी मार्गात रेल्वे प्रशासनाने लावलेल्या लोखंडी पाईप व पुलाखालील रस्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे या द्विधा अडचणीत पुलाखालून नाईलाजाने वाहतूक करणारी पंचक्रोशीतील गावे अगतीच त्रस्त झाली आहेत.यामुळे या गावांचा एकप्रकारे विकास खुटण्यास हा रेल्वे भुयारी मार्ग जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काही ही फायदा झाला नाही. उलट रेल्वे अधिकारी हा रस्ता रेल्वेच्या अधिपत्याखाली आहे तसेच हा रहदारीचा रस्ता नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देतात किंवा रस्ता कायमचा बंद करून देण्याची धमकी देतात.त्यामुळे या रेल्वे भुयारी मार्ग काँक्रिटीकरण करून पंचक्रोशीतील गावांना होणारा त्रास थांबवावा अशा मागणीचे तसेच ग्रामपंचायत ठरावाचे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांना हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे देण्यात आले.याप्रसंगी हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे,अंधारी येथील सरपंच तान्हाजी वाघ, पोलीस पाटील शरद नागरे,आनंदा वाघ,प्रफुल्ल पाटील,हातगाव सरपंच दत्ता नागरे,तमगव्हाणचे पत्रकार सुनिल पाटील, पिंपळवाड नि.चे माधव वाघ, शिरिष जगताप, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button