Parola

साध्या पद्धतीने साजरा होणार ब्रह्म उत्सव

साध्या पद्धतीने साजरा होणार ब्रह्म उत्सव

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : पारोळा शहराचे ग्रामदैवत असणारे श्री बालाजी महाराज यांच्या ब्रह्म उत्सवाचे आगमन झाले आहे. पण या ब्रह्म उत्सवाला कोणाची नजर लागली आहे यावर्षी देखील गतवर्षाप्रमाणे घरगुती वातावरणात व अगदी साध्या पद्धतीने ब्रह्म उत्सव साजरा होणार आहे असे संस्थानचे मुख्य विश्वस्त यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
अशी आहे ब्रह्म उत्सवाची रूपरेषा
अश्विन शुद्ध ७ वार मंगळवार दिनांक १२/१०/२०२१ रोजी सप्तमी ची पालखी साध्या पद्धतीने गिरीशेठ शिंपी यांचे स्मारक (समाधीस्थळ) येथे भेट होईल.

अश्विन शुद्ध एकादशी वार शनिवार दिनांक १६/१०/२०२१रोजी श्रीं चा मानाचा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात रथ म्हणून पारोळा शहराला मानाचे स्थान आहे पण या कोरोना चे संकट अजूनही टळलेले नसून यावर्षी देखील अगदी साध्या पद्धतीने व सरकारच्या नियमानुसारच साजरा होणार असून श्री बालाजी महाराज यांचा रथ हा मानापुरता जागेपासून पाच पाऊल हलवण्यात येणार आहे.

तद्नंतर कोजागिरी पौर्णिमेची पालखीचे राममंदिर येथे अभिषेक होऊन बालाजी मंदिरात ब्रम्ह उत्सवाची सांगता करण्यात येईल.

महाप्रसादाचे वाटप
महाप्रसादाचे वाटप हे पाच लाडूंचे पाकीट घरोघरी वाटण्यात येणार आहे. श्रीं चा महाप्रसाद हा मंगेश तांबे यांच्या कडून देण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button