Chalisgaon

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी केली औषध फवारणी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी केली औषध फवारणी

मनोज भोसले

कोरोना विषाणू चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून शहरी व ग्रामीण भागात देखील त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, केंद्र व राज्य सरकार, आरोग्य विभाग आपापली जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने टाकळी प्रचा येथून औषध फवारणी ला सुरुवात करण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः गल्ली बोळात जाऊन औषध फवारणी करत नागरिकांना काही दिवस घरातच राहण्याची विनंती केली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रयत्नांचे कौतुक होत असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण शहरात यापद्धतीने फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे यांनी दिली.

#ISupportJantaCurfew
#IndiaFightsCorona
#BreakOutCorona

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button