sawada

शिरसाळा मारुती दर्शनास गेलेल्या सावदा येथिल दोघे तरुण अपघातात ठार!

शिरसाळा मारुती दर्शनास गेलेल्या सावदा येथिल दोघे तरुण अपघातात ठार!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाळ्यात कायमचे रहिवासी तरुण बोडवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी आज दि. २६ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना बहर्डी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सख्या दोघे चुलत भाऊ ठार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,जागृत हनुमान मंदीर शिरसाळा येथे सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाडा परिसरातील दोन तरुण दर्शनासाठी जात असताना बोहर्डी गावा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू झाला.तर लखन कुंभार याचा भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले दोघे तरुण मोलमजुरी करून आपल्याला कुटुंबाचे उद्धार निर्वाह करणारे व आधार होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button