Chalisgaon

MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंद

MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंदनितीन माळेचाळीसगाव MIDC मध्ये कत्तलखाण्याची विटही रचू देणार नाही – आमदार मंगेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहितीचाळीसगाव – मागील २०१४ मध्ये आघाडी शासनाच्या काळात मंजुर असलेल्या तालुक्यातील खडकी एम.आय.डी.सी. मध्ये कत्तलखाण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र सदर कत्तलखानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाणार असल्याने त्यास भाजपा शासनाच्या काळात स्थगिती देण्यात आली होती. मात्र मागील काही महिन्यात निवडणूक आचारसंहिता व नवीन शासन स्थापन झाल्याच्या फायदा घेत सदर मोहसीन ऍग्रो नावाच्या कत्तलखाण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे लक्षात आले. म्हणून मी व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी MIDC मध्ये जाऊन त्याचे काम बंद पाडले वेळप्रसंगी माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल पण या कारखान्याला एक वीट देखील रचू देणार नाही अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दि 19 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.Midc मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंदते पुढे म्हणाले की चाळीसगाव तालुक्यातील खडकी एम आय डी सी त D2 प्लॉट मध्ये 8 हजार स्क्वेर मीटर म्हणजे च 8 लाख 61 हजार स्केअर फूट एवढा मोठा भुखंड मोहसीन ऍग्रो कंपनीला दिला गेला आहे व या कत्तलखान्याचे काम लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचा फायदा घेऊन युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते व याची माहिती मिळाल्यावर काल लागलीच भाजपचे पदाधिकारी, सहकारी व नगरसेवक यांच्या सोबत जागेवर जाऊन माहिती घेतली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.Midc मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंदसदर कत्तलखाना हा राज्यातील सर्वात मोठया कत्तलखान्यां पैकी असणार होता. याबाबत यापूर्वीही २०१५ मध्ये तत्कालीन आमदार उन्मेशदादा पाटील व अनेक संघटनांनी विरोध केल्यावर त्याचे काम बंद करण्यात आले होते. या जागेवर शेकडो जनावरे कत्तल होऊन शहराच्या शांततेला गालबोट लागण्याची शक्यता आहे तसेच कत्तलखान्यातुन प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून चाळीसगाव वासीयांच्या भावनांनाच माझे व माझ्या पक्षाचे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत भाजपा तालुका अध्यक्ष प्रा सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, माजी उपसभापती संजय पाटील, नगरसेवक विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, रोहिणी चे सरपंच अनिल नागरे, उद्योगपती हिराशेठ बजाज जैन संघटनेचे शैलेश कोठारी, प्रेमचंद खिंवसरा, संदीप बेदमुथा, संदेश टाटीया, संदीप देसरडा, सुशील सोलंकी, राजमल जैन, मयूर सोलंकी, ऋषभ जैन, हितेश सोलंकी, निवृत्ती आण्णा कवडे, संजय कापसे, भुषण पाटील, जितू वाघ, यांच्या सह जय बाबाजी भक्त परिवार, भक्त पारायण परिवार, चाळीसगाव पुरोहित संघाचे पदाधिकारी, खडकी बुद्रुक गावाचे ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button