Nashik

कादवा चे दोन लाख मे.टन ऊसाचे गाळप, रू.2040 ऊस बिल बँक खाती वर्ग

कादवा चे दोन लाख मे.टन ऊसाचे गाळप, रू.2040 ऊस बिल बँक खाती वर्ग

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी – कादवा सहकारी साखर कारखान्याने 80 दिवसात दोन लाख मे टन ऊसाचे गाळप केले असून ऊस बिलापोटी अगोदर रू.1885 व आता रू.155 असे एकूण रु. 2040 ऊस उत्पादकांचे खाती वर्ग केले आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून 80 दिवसात दोन लाख मे.टन ऊस गाळप केले असून आज 12.08% साखर उतारा मिळाला आहे. सरासरी 10.73% साखर उतारा मिळत 212050 क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखर विक्रीस उठाव नाही त्यामुळे जुनी साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.नुकतीच कादवा ने 27000 क्विंटल साखर निर्यात केली आहे ऊसाचे बीलापोटी सुरवातीला रू.1885 अदा करण्यात आले होते आता रू.155 बँक खाती वर्ग केले असून एकूण 2040 पेमेंट अदा झाले आहे. इथेनॉल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर सदर प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न आहे.कादवा कारखान्याने कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त ऊस तोड सुरू असून ऊस तोडणीचे नियोजन करत ऊस तोड कार्यक्रमानुसार ऊस तोडणी सुरू आहे.तरी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे,व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव यांनी केले आहे.यावेळी सर्व संचालक,कार्यकारी संचालक हेमंत माने,सर्व अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button