आटपाडी

जिंदाबाद,जिंदाबाद हमारे किसान जिंदाबाद

जिंदाबाद,जिंदाबाद हमारे किसान जिंदाबाद

सादिक खाटीक आटपाडी
दीपोत्सवाचा पहिला दिवस वसूबारसचा असून भारतीय संस्कृती शेतीप्रधान होती, आहे आणि भविष्यात राहणार आहे . शेती, शेतकरी आणि गाय वासरू प्रतिकाचे भारतीय जीवनात महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस . भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने स्वातंत्र्यानंतरच्या अनेक निवडणूकामध्ये बैलजोडी आणि नंतर गाय वासरू या निवडणूक चिन्हांतून शेतकरी , शेती परिवाराविषयी नितांत श्रद्धा व्यक्त केली होती . मर्यादित साधन सुविधांचा हा देश गत ७० वर्षात अरबो खरबोने संपूर्ण देशभर साकारलेल्या सर्वप्रिय, सर्वस्पर्शी , सर्वमान्य , सर्वोत्तम सोयी सुधारणा आणि नेत्रदिपक प्रगतीने जगाचे डोळे दिपवू शकला . जगात सर्वशक्तीमान मोजक्या राष्ट्रांच्या पंक्तीत पहिल्या पाचात गणला जावू शकला . आजही थोडेसे राष्ट्रहिताचे धोरण स्विकारले गेले तर माझा भारत जगाचा सरताज बनू शकेल . सर्वच धर्मातल्या सर्वसामान्य ९५ टक्के देवभक्त भोळ्या समाजाचा, सर्वच धर्माच्या धार्मिक व्यवस्थांमध्ये प्रतिवर्षी जमणारा पैसा , अलंकार वगैरे एकत्रीत केल्यास ते भारतीय बजेटच्या १८ पट इतके जमत असल्याचे संसदेत लेखी उत्तराद्वारे सांगीतले गेले आहे . मात्र हा पैसा प्रत्येक धर्मातल्या मुठभर उच्चभ्रु विश्वस्तांच्या ट्रस्टच्या ताब्यात असून ते भारतीयांचे धन….ना सामान्य घेवू शकतात …ना सरकार आपल्या तिजोरीत जमा करू शकते . हे निरर्थक पडून असलेले धन सरकारी तिजोरीत आल्यास भारताच्या एक रूपयाची किंमत २०० डॉलर बरोबर होवू शकते. हा देश प्रतिवर्षी १९ पट विकासाच्या गतीने प्रचंड प्रगती करू शकतो . सारे जहाँ (जगा ) ला जगवू शकेल इतके अन्नधान्य , भाजीपाला , फळफळावळ , तेल , गुळ , साखर , औषधी वनस्पती , चारा यांची निर्मिती करू शकतो . सारे जहाँ च्या पिण्याच्या , शेतीच्या पाण्याचे नियोजन आणि प्रत्येक जीवाला पुरक ठरेल असे पर्यावरण साकारण्यात मेरा भारत सफल रहेगा . मेरे देश की धरती , सोना उगले उगले हीरे मोती… हे उगीच नाही म्हंटलेलं . विश्वचि माझे घर समजणाऱ्या भारतीय संस्कृतीतल्या सर्वात अग्रस्थानी असलेल्या शेतकरी , पशु – पक्षी पालक मायबापांना राजा सारखे दिवस येवोत , प्रत्येक भारतीय याच विचारधारेची ज्योत प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत जावो आणि बंधुभावाच्या प्रेमाची गंगा सर्वत्र ओसंडून वहात राहो … हीच वसूबारस च्या प्रारंभाने सर्वांना दीपावलीच्या करोडो शुभेच्छा . …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button