Amalner

?Big Breaking.. खान्देश शिक्षण मंडळाची अमळनेर नगरपरिषद का आहे ?अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!खादाड नगरपरिषदेच्या टॅक्स पावती वर खा(खादाड).शि..!

? Big Breaking..
खान्देश शिक्षण मंडळाची अमळनेर नगरपरिषद का आहे ?
अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!खादाड नगरपरिषदेच्या टॅक्स पावती वर खा.शि..!

अमळनेर नगरपरिषद विकली गेली का..?

अमळनेर नगरपरिषदेची टॅक्स पावती वितरित करण्यात येत आहे. या पावतीवर एका बाजूला खान्देश शिक्षण मंडळ ची जाहिरात केली आहे.. इतकी न. पा.अमळनेर ची दैना झाली आहे का..? नागरिकांच्या टॅक्स पावती देखील स्वतः वितरित करू शकत नाही का .?भिकेचे डोहाळे लागलेली नगरपरिषद म्हणावी लागेल का?अमळनेर नगरपरिषदेची टॅक्स पावती स्व खर्चाने देण्याची आर्थिक कुवत नाही का? असे अनेक प्रश्न जनतेतून उचबळून बाहेर चर्चेला येत आहेत.

अमळनेर नगरपालिकेच्या टॅक्स पावतीवर चक्क एका बाजूला खान्देश शिक्षण मंडळाची जाहिरात केलेली आहे. नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवू न शकणारी अशी ख्याती म्हणून अमळनेर ची नगरपरिषद प्रसिद्ध आहे असेच काही चर्चेचा सुरु मागील 2 वर्षात बाहेर येत आहे, तसेच नांगीरिकांच्या टॅक्स मधून ज्या प्रशासकीय अधिकऱ्याचा पगार होतो (पोट पाणी चालते) अशे प्रशासनातील काही बडे आणि मध्यम अधिकारी राजकीय तालावर जबादारी विसरून कसे व किती नाचावे याला मर्यादा राहिली नाहि (विटाळ प्रकार ).

एक प्रकारे खान्देश शिक्षण मंडळाच्या चमू चे राजकीय प्रचारच या माध्यमातून केला जात असल्याची चर्चा गावात सुरू आहे. तसेच खा शि आपल्या खादाड पणा मुळे कुप्रसिद्ध आहे आणि अश्या खादाड शिक्षण संस्था ची जाहिरात करून अमळनेर नगरपरिषद नेमकं काय साधत आहे?यावर सध्या चर्चा रंगली आहे.

?Big Breaking.. खान्देश शिक्षण मंडळाची अमळनेर नगरपरिषद का आहे ?अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!खादाड नगरपरिषदेच्या टॅक्स पावती वर खा(खादाड).शि..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button