Maharashtra

संत रविदास मंदिर तोडल्याचा चर्मकार उठाव संघाकडून केजरीवाल यांचा पुतळा जाळून निषेध

संत रविदास मंदिर तोडल्याचा चर्मकार उठाव संघाकडून केजरीवाल यांचा पुतळा जाळून निषेध

संत रविदास मंदिर तोडल्याचा चर्मकार उठाव संघाकडून केजरीवाल यांचा पुतळा जाळून निषेध

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
चर्मकार समाजाचं आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांचं 600 वर्षापूर्वीचं मंदिर दिल्ली सरकारने अकारण तोडले, त्या बरोबरच तेथील समाजाच्या नावावर असलेली जागा तांब्यात घेण्याचा घाट केजरीवाल सरकरकडून केला असुन यांच्या निषेधार्थ आज चाळीसगाव येथे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पुतळा जाळून आज दि.21 रोजी निषेध करण्यात आला.
संत रविदास महाराजांचं मंदिर तोडल्याच्या घटनेचा देशभरात निषेध होत आहे महाराष्ट्रातील चर्मकार उठाव  संघ जळगाव, नंदुरबार, शहादा, पाचोरा,एरडोल, आडगाव ,धरणगाव येथिल समाज बांधवानी देखील  आपली निवेदने देऊन निषेध करीत निदर्शने केली आहेत.
जळगाव  जिल्हयाच्या वतीने देखील जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आलं आहे तर आज चाळीसगाव तालुका कार्यकारणीच्या वतीने या बेजबाबदार कृत्याला पाठबळ देणाऱ्या केजरीवाल सरकारचा निषेध व्यक्त करत ल मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करन्यात आला आंदोलनात प्रदेशाध्यक्ष मोतीलाल भाऊ अहिरे राज्य संघटक शिवाजी गांगुर्डे,तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संभा आप्पा जाधव, नगरसेवक अरुण बापू अहिरे व्यापारी जिल्हाध्यक्ष देवेंद्र गांगुर्डे
शहराध्यक्ष आनंद गांगुर्डे बहुजन क्रांती मोर्चा मुकेश नेतकर ,खुशाल मोरे,अशोक जाधव, भैयासाहेब देवरे, संजय वानखेडे, गणेश गांगुर्डे, गोकुळ अहिरे,सोपान अहिरे, ऋषिकेश गांगुर्डे, विजय अहिरे, प्रशांत अहिरे, वाल्मिक महाले, सांदीप मोरे, राजु बोरसे, पी एन देवरे, नाना शिंपी, समाधान सोनवणे, देविदास खरटमल वाल्मिक मोरे, समाधान मोरे, सचिन सोनवणे, निलेश आहिरे, छोटूलाल सरोदे, अमोल पाटील, प्रवीण अहिरे,रामराव अहिरे,रमेश अहिरे,खुशाल मोची ,संदेश पाथरे, रवींद्र अहिरे,अनिल महिराळे , लक्षण गांगुर्डे, सागर गांगुर्डे,विनोद मोरे, सागर पाटील, कृष्णा घुगे, कृष्णा वाघ, अशा सर्वांनी सहभाग नोंदवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button