Maharashtra

Amazing: जगातील एकमेव आश्चर्य..! तर ही नदी वाहते उलटी… जाणून घ्या शास्त्रीय आणि पौराणिक कारण..!

Amazing: जगातील एकमेव आश्चर्य..! तर ही नदी वाहते उलटी… जाणून घ्या शास्त्रीय आणि पौराणिक कारण..!

तुम्ही सर्वांनी आजपर्यंत ऐकले असेल की भारतातील बहुतेक नद्या एकाच दिशेने वाहतात आणि ती दिशा म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे! बहुतांश नद्यांचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. पण देशात अशी एकमेव नदी आहे जी उलट वाहते. होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे, आपल्या देशात अशी एक नदी आहे, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या त्या नदीचे नाव नर्मदा. या नदीस रेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते.

भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आणि देशातील इतर सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागरात येतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नर्मदा ही देशातील एकमेव नदी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणिते अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील एक मुख्य नदी आहे जी भारताच्या मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरावरून उगम पावते.

म्हणून नर्मदा नदी उलट्या दिशेने वाहते

नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे. यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते.

इतर सर्व नद्यांच्या उलट, नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे अनेक कथा पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. असे म्हणतात की नर्मदेचा विवाह सोनभद्राशी होणार होता पण सोनभद्र नर्मदेची मैत्रिण जुहिलावर प्रेम करत असे. यामुळे संतप्त झालेल्या नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला. भौगोलिक स्थितीवरही नजर टाकली, तर नर्मदा नदी सोनभद्रा नदीपासून एका विशिष्ट बिंदूवर विभक्त होते. आजही ही नदी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते, हे आश्चर्यापेक्षा कमी नाही.

नर्मदा नदी तिच्या उगमापासून पश्चिमेला १,३१२ किमी प्रवास करते आणि खंभातच्या आखात, अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याची जीवनदायिनी नदी आहे. अरबी समुद्रात जाऊन मिळण्यापूर्वी, नर्मदा नदी १,३१२ किलोमीटर लांबीच्या मार्गाने मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या प्रदेशातून ९५, ७२६ चौरस किलोमीटर पाणी वाहून नेते. नर्मदा नदीला ४१ उपनद्या आहेत. यामध्ये २२ नद्या डाव्या तीरावर आणि १९ नद्या उजव्‍या तीरावर मिळतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button