Maharashtra

Politics: शरद पवारांचा असाही एक गेम…! किस्सा वाचून म्हणाल की व्वा.. व्वा!

Politics: शरद पवारांचा असाही एक गेम…!

राजकीय गेम संदर्भात सर्वात प्रथम पहिलंच वाक्य असेल ते म्हणजे पवारांचा गेम. पवारांचे गेम हे राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द आहेत. पवार कधी कशी गेम करतील ये सांगता येत नाही. पण गोष्ट अशी आहे की प्रत्येक गेम मोठ्ठाच असेल अस पण काही नाही.
कधीकधी तर पवारांनी अगदी साध्या छोट्या मजेशीर गेम केलेल्या आहेत. अशा साध्या छोट्या छोट्या गेमवर कधी संपादकिय छापून आलं नाही की न्यूज चॅनेलच्या बातम्यांमध्ये त्या चर्चेत आल्या नाहीत पण इतिहासाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पवारांचे असे किस्से लपून राहिले आहेत…

तर असाच एक किस्सा पवारांनी केलेल्या गेमचा.. पाहू या काय घडलं होत…
जो ऐकल्यानंतर तुम्हीपण म्हणाल राव छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठ्ठे डाव
मारायचे असतात..
तर किस्सा तसा जूनाच आहे. जूना म्हणजे खूप जुना…तारिख, वार, सांगता येत नाही पण काळाचा अंदाज सांगता येतो. तेव्हा शरद पवार नुकतेच युवा आमदार म्हणून बारातमीतून निवडून आले होते तर उल्हासदादा पवार हे युथ कॉंग्रेस राज्याचे अध्यक्ष झाले होते.

झालं अस की या दोघांना दिल्लीतल्या एका केंद्रिय मंत्र्याला भेटायला जायचं होत.ठरल्याप्रमाणे दोघेही दिल्लीला गेले.
आजच्या सारख्या विमानतळावर उतरल्या उतरल्या हजर होणारा गाड्यांचा ताफा तेव्हा त्यांच्याकडे नव्हता.

उतरल्यानंतर दोघांनी केंद्रिय मंत्र्यांच्या घरी जाण्यासाठी टॅक्सी केली. टॅक्सी चालवणारा व्यक्ती होता एक सरदार..

शरद पवारांनी टॅक्सीत बसल्यानंतर केंद्रिीय मंत्र्यांच्या बंगल्याचा पत्ता सांगितला आणि भाडं किती होईल हे पण विचारलं. सरदारजीनं उत्तर दिलं.
आत्ता विषय इतक्यावरच संपण्यासारखा होता पण पवारांना इथं गेम करण्याची
हुक्की आली. आणि एक मजेदार किस्सा घडला…

पवारांनी काय केलं तर सरदारजीला टॅक्सीच्या भाड्याची अंदाजे रक्कम अगोदरच देवून टाकली आणि सरदारजीला सांगितलं,
तुला भाड्याची रक्कम मिळालेय. आपण जेव्हा केंद्रिय मंत्र्यांच्या बंगल्यावर
पोहचू तेव्हा आम्हाला घेण्यासाठी ते बाहेर येतील. तेव्हा आम्ही तुला भाडे विचारू पण नको म्हणायचं, म्हणायचं की, अहो तुम्ही या मंत्र्याकडे आलात.हे गोरगरिबांसाठी किती काम करतात. जनतेसाठी किती काम करतात. त्याच्याकडे आलेल्या लोकांकडून मी कसे पैसे घेवून. अन् पैसे न घेता निघून जायचं… सरदार ने ओके म्हटल.

ठरलं आत्ता टॅक्सी बंगल्याच्या दारात पोहचली आणि केंद्रिय मंत्री शरद पवार व उल्हासदादा पवारांना घेण्यासाठी स्वत: बाहेर आले. आत्ता शरद पवार टॅक्सीवाल्याला पैशाचा आग्रह करु लागले तोच टॅक्सीवाला नको नको करू
लागला. मंत्रीमहोदयांकडे पहात अहो, तुम्ही या साहेबांचे पाहूणे वगैरे
ठरलेले डायलॉग फेकू लागला…

पैसे न घेता टॅक्सीवाला गेला अन् इकडे मंत्रीमहोदयांचा चेहरा खुलला. ते शरद
पवारांना सांगू लागले. बघ शरद दिल्लीत मला किती लोक मानतात. बघितल ना
टॅक्सिवाल्याने तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत. केंद्रिय मंत्री शरद पवारांना
आपली स्तुती सांगत होते अन् शरद पवार गेम केल्याच्या खुशीत होते. हा किस्सा अंकुश काकडे यांनी आपल्या हॅशटॅग पुस्तकात लिहून ठेवला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button