Pune

वनगळीच्या वृध्देच्या सोन्याची इंदापूरात लुट

वनगळीच्या वृध्देच्या सोन्याची इंदापूरात लुट

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर शहरांमध्ये दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसाठी दुचाकीवर घरी सोडण्याचे अमिष दाखवीत दुचाकीवरून अज्ञात स्थळी नेत जबरदस्त मारहाण करीत लुटले.

दरम्यान एका महिन्यात दोनदा ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार इंदापूर मध्ये घडल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार (ता. 27) रोजी भर दुपारी वनगळी गावच्या रहिवाशी रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय-80 वर्षे) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या.
एस टी बस वेळेवर नसल्याने त्या पायी चालतच गावाकडे चालल्या होत्या. त्या घराकडे परतत खुळे चौका मध्ये असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने तुमच्या गावात सोडतो म्हणून आजीला गाडीवर बसवले. त्यानंतर त्याने पंपावर पेट्रोलही टाकले. व पुढे बाह्यवळण मार्गाने सरडेटोल नाक्याच्या दिशेने अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण करीत गळ्यातील व दोन्ही कानातील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले यामध्ये आजीच्या कानाला व गळ्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

तसेच चोरट्याने आजीला मारहाणही केली असल्याचे आजीने संगितले. यामुळे आजीच्या हात, पाय, गळा ,कान यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या उपचारासाठी त्यांना सामाजिक कार्यकर्ते गफुरभाई सय्यद व सागर सुर्यवंशी यांनी दाखल केले.

याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button