Pune

ब्रह्मचाराचा मृत्यूनंतर गावाने केले अंतिम संस्कार व सर्व धार्मिक विधी.

ब्रह्मचाराचा मृत्यूनंतर गावाने केले अंतिम संस्कार व सर्व धार्मिक विधी.

महाराष्ट्र होत आहे वनगळी गावाची कौतुक, गावकरीच झाले नातेवाईक .

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील ब्रह्मचारी सोमनाथ लक्ष्मण मदने (वय ८२) हे लहान वयापासून वनगळी येथील पारेकर वस्ती येथे राहत होते .त्यांचे आई वडील लहानपणी वारले होते व त्यांना कोणताही नातेवाईक नाही.ते याच गावात लहानपणापासून मोलमजुरी करत, व देवाची सेवा करत. हे सर्व करत असताना पारेकर कुटुंबियांनी त्यांचा लहान पणी सांभाळ केला. मदने यांना पांडुरंग भक्तीची व हनुमंताची भक्ती आवड होती. त्यांनी लग्न देखील केले नाही . आळंदी ते पंढरपूर वारी ते नित्यनेमाने करीत‌. वय झाल्यानंतर ते याच गावात माधवगिरी मागुन करून आपले जीवन जगत होते‌. त्यांचा सांभाळ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गोविंद पारेकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला त्यांचा मृत्यू देखील त्यांच्याच घरी झाला .

सोमनाथ मदने यांना एक गुंठा देखील स्वतःची जमीन नाही. पारेकर वस्ती येथे सार्वजनिक स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्काराचे प्रश्न निर्माण झाला होता . परंतु माणिक सिताराम पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या शेतामध्ये त्यांनी अंतिम संस्कार साठी जागा दिली. त्यांच्या चितेला ज्यांनी त्यांचा शेवटी सांभाळ केला ते एकनाथ पारेकर यांनी त्यांच्या चितेला भडअग्नी दिला. मदने यांच्या अंतिम संस्कारावेळी गावातील व पंचक्रोशीतील सामाजिक ,राजकीय ,धार्मिक , शैक्षणिक,क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गावातील तरुण , महिला, देखील उपस्थित होते.

त्यांच्या अंतिम संस्कारानंतर त्यांचा हिंदू धर्म प्रमाणे तिसरा विधी देखील दहावा विधी देखील पंढरपूरमध्ये येथे जाऊन गावकऱ्यांनी केला. यासाठी हिरालाल पारेकर, एकनाथ पारेकर, माणिक पाटील, दिलीप भिसे ,धनाजी पारेकर, दशरथ पारेकर, रामभाऊ जाधव, मोहन पारेकर, शरद पारेकर, सुनील पारेकर, संतोष कांबळे महाराज , समाधान पारेकर व गलांडवाडी क्र १ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व गावातील तरुण यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button