Pune

अण्णाभाऊ साठे हे वास्तववादी शाहीर व लेखक होते :- प्रा. जावेद शेख भिमाई आश्रमशाळेत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन

अण्णाभाऊ साठे हे वास्तववादी शाहीर व लेखक होते :- प्रा. जावेद शेख

भिमाई आश्रमशाळेत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे ;अण्णाभाऊंनी जे गायले व लिहिले ते वास्तवावर आधारित होते, म्हणून ते वास्तववादी शाहीर व लेखक होते असे गौरोद्गार अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी प्रा.जावेद शेख यांनी काढले.
वंचित, शोषितांच्या व्यथांवर आपल्या शाहिरी बाण्यातून फुंकर घालणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंची १०३ वी जयंती भिमाई आश्रमशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जावेद शेख बोलत होते.

यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात संस्थेचे संचालक संजय कांबळे यांच्या हस्ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार ,तर तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे‌ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी आपल्या भाषणांतून अण्णाभाऊ साठेंच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त संचालक संजय कांबळे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊसाठी ११००/- रुपये दिले.

यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे,प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे,प्राध्यापक, शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button