Pune

वनगळीत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप

वनगळीत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: नामांकित पशुखाद्य असलेल्या हिंदुस्थान फीड्स – बारामती कॅटल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड,बारामती यांच्या सीएसआर फंडातून इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळी पारेकरवस्तीमधील इयत्ता पहिली ते चौथी तील विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप अजय पिसाळ जनरल मॅनेजर व विनोद वसेकर सेल्स एक्झिक्युटिव्ह यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले यावेळी ,श्री.रामदास मेटकरी साहेब-मार्केटिंग ऑफिसर इंदापूर तालुका,मनोहर भोंडवे साहेब-सेल्स ऑफिसर, श्री.हिरालाल पारेकर-संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना,श्री.दत्ता पारेकर-अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पारेकर वस्ती, ग्रामस्थ यशवंत पारेकर, मुख्याध्यापक संतोष घोडके ,सहशिक्षिका सविता पवार, अंगवाडी शिक्षका संगिता भिसे
यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button