Pune

मणिपुर आत्त्याचार प्रकरणी आम आदमी पार्टी कडून केंद्र सरकारचा निषेध

मणिपुर आत्त्याचार प्रकरणी आम आदमी पार्टी कडून केंद्र सरकारचा निषेध

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :इंदापूर तालुक्यातील आम आदमी पार्टीच्या वतीने मणिपूर अमानुष अत्याचाराचा व केंद्र सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. दोषीवर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयाच्या मार्फत पंतप्रधानाकडे पाठवण्यात आले आहे.

मणिपुर राज्यातील महिलांवर झालेल्यां अत्याचाराचे छायाचित्र ,व्हिडिओ, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आली. अशी कृती माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. त्यामुळे संपूर्ण भारत देश व्यथीत झाला आहे . असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीचे इंदापूरचे पदाधिकारी रामचंद्र पाटील,अमोल देवकते राजकुमार रासकर ,प्राजक्ता रासकर, अविनाश जाधव यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे‌

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button