आटपाडी

आटपाडी विधवा महिला विकास प्रतिष्ठानचे खरे लक्ष्मीपूजन

आटपाडी विधवा महिला विकास प्रतिष्ठानचे खरे लक्ष्मीपूजन

राहुल खरात
आटपाडी आटपाडी तालुक्यातील आवळाई येथील वनिता दादासो वाघमारे विवाह ८०% अपंगत्व असतानाही तिला चालता येत नसताना ही वयाच्या ३५ व्या वर्षी ४७ वर्षाचे तानाजी देवाप्पा होवाळ यांच्याशी
१३/६/२०१६ रोजी करण्यात आला होता त्यानंतर लग्न च्या ३ वर्षांनी त्यांना कन्यारत्न झाले लेक वाचवा लेक शिकवा या उक्ती प्रमाणे आज लक्ष्मीपूजन निमित्ताने विधवा महिला विकास प्रतिष्ठान आटपाडी च्या अध्यक्षा श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे सचिव अनिता उत्तम जाधव यांनी खऱ्या अर्थाने लक्षमी पूजन केले आहे !
या कन्ये साठी प्रतिष्ठानने पोस्ट च्या कन्यादान योजनेतून ५००० रुपये डिपॉझिट ठेवली आहे व तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे अशा प्रकारे लक्षमी पूजन साजरे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे !
या प्रसंगी रेश्मा पाटील ,अनुराधा पाटील,माया वाघमारे, सुरेखा वाघमारे, मंदा धांडोरे,नंदा, सुरेखा, चन्द्रभाग वाघमारे व आवळाई गावच्या अनेक स्त्रिया ची उपस्थिती होती !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button