Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर शहरात प्रेमी युगुलांची धामधूम..नामांकित शाळांमधील प्रकार उघडकीस..पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रेमी युगुल पालकांकडे सुपूर्त..

?️अमळनेर कट्टा..अमळनेर शहरात प्रेमी युगुलांची धामधूम..नामांकित शाळांमधील प्रकार उघडकीस..पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रेमी युगुल पालकांकडे सुपूर्त..

अमळनेर येथील चार प्रेमी युगुल पळून जाण्याआगोदरच पोलिसांच्या प्रयत्नांमुळे घरी पालकांकडे सुरक्षित पणे ताब्यात घेऊन सुपूर्त करण्यात आले आहेत.पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योग्य त्या सवधानतेमुळे सदर चारही प्रेमी युगुलाना पळून जाण्यापूर्वी च ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की अमळनेर शहरातील रफू चक्कर झालेले दोन प्रेमीयुगुल आणि रफू चक्कर होणारे दोन असे चार प्रेमीयुगुल ना पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी समजूत घालून पळून जाण्यापासून परावृत्त करत घरी आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.या मुलांचे मन परिवर्तन केले आहे. यामुळे दोन मोठ्या समाजात मोठा तणाव होऊ शकला असता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी शनिवारी अमळनेर पोलीस स्टेशनला पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी ते बोलत होते. यावेळी डीवायएसपी राकेश जाधव आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे उपस्थित होते.

शहरातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या दोन मुली एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होत्या. त्यांचे आठव्या इयत्तेपासून वर्गातील एकाशी व त्याच्या मित्राशी प्रेम संबंध जमले होते.ही मुले १९ वर्षांची झाल्यावर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि पळून जाण्याचे ठरविले होते. पालकांना ही माहिती मिळाली होती. ‘लवजिहाद’सारखा प्रकार असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. मुलाचे वय २१ नसल्याने ते बेकायदेशीर होते. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत मुलींचे मन परिवर्तन करून मुलांना त्यांच्या संभाव्य धोक्याची व कायद्याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे मुले-मुली आपल्या पालकां सोबत जाऊन त्यांनी निर्णय बदलला व मोठा तणाव होण्यापासून वाचला.

दुसऱ्या एका घटनेत पिंपळे रोडवरील एक तरुणी दीपाली (नाव बदलले आहे) २३ रोजी रात्री आठच्या सुमारास आपला मित्र राहुलसोबत (नाव बदलले आहे) घरातून २७ हजार रुपये रोख व सोन्याची पाच ग्राम अंगठी घेऊन निघून गेली होती. पालकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पो.नि.मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे नरेंद्र वारुळे यांची तांत्रिक मदत घेऊन सुनील हटकर याना प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास सांगितले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची समजूत घालून मन परिवर्तन केले आणि पालकांच्या ताब्यात देऊन मुलाचा पुण्याचा मित्र राकेश पाटीलकडून रोख रक्कम व सोन्याची अंगठी मुलीच्या पालकांच्या स्वाधीन केली.

तर चौथ्या घटनेत एका मुलीला घेऊन एक मुलगा पळवून घेऊन गेला होता .ही माहिती पसरताच शहरात दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने गोपनीय अंमलदार शरद पाटील यांना कळल्यावर त्यांनी पो.नि.मोरे याना सांगितले. त्यांनी सत्तार तेली, सईद तेली, अब्दुल हमीद शेख, आमिर खाटीक, संतोष लोहरे, नितीन लोहरे या दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन प्रेमीयुगुलाला जळगाव येथून परत आणून त्यांना होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली. त्यामुळे या दोन समाजातील तणाव निवळून मुलगा, मुलगी पालकांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील चारही घटनांमुळे वातावरण थोडे खराब झाले आहे तर कुटुंबीय मात्र योग्य ते निर्णय झाल्याने आनंदी झाले आहेत.

हल्ली मोबाईल, इंटरनेट अल्पवयात मुले बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. घरा घरातील संवाद कमी होत चालला आहे.त्यांचे मोबाईल, मित्र, मैत्रिणी याची माहिती घेत राहणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा.-सचिन गोरे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव

मुले बाहेर प्रेम,स्नेह,जिव्हाळा शोधण्याच्या नादात,मैत्री च्या नादात वावहत जातात.योग्य अयोग्य ची जाणीव ,समज त्यांना नसते.प्रेम करणे प्रेम विवाह करणे अयोग्य नसून योग्य वेळ,योग्य व्यक्ती,योग्य वय असेल तर ते फारसं चुकीचंही नाही.पण आता पालकांनी आणि शाळाचालकांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे..पोलीस निरीक्षक अंबादास मोरे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button