Yawal

आदीवासी उपयोजना प्रकल्पस्तरिय जिल्हा सदस्यपदी तडवी दाम्पत्यांची निवड झाल्याबद्दल युवक राष्ट्रवादीने केला सत्कार

आदीवासी उपयोजना प्रकल्पस्तरिय जिल्हा सदस्यपदी तडवी दाम्पत्यांची निवड झाल्याबद्दल युवक राष्ट्रवादीने केला सत्कार

शब्बीर खान

यावल येथील आदीवासी समाजातील जेष्ठ समाजसेवक तथा प्रदेश अध्यक्ष आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच , महाराष्ट्र राज्य यांची आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आदीवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा / कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरिय ( नियोजन आढावा समितीच्या अशासकीय जिल्हा सदस्यपदी सेवानिवृत मुख्याध्यापक एम .बी . तडवी व त्यांच्या पत्नी जुबेदा मुजाद तडवी यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील , युवक राष्ट्रवादीचे तालुका समन्वयक गोलु माळी, युवक राष्ट्रवादीचे यावल शहर कार्यध्यक्ष नरेन्द्र शिंदे , ललीत नेमाडे यांनी तडवी दाम्पत्यांचे स्वागत सत्कार केले . यावेळी एक अभ्यासु व्याक्ती म्हणुन ओळख असलेल्या तडवी सरांकडुन सर्वसामान्य गोरगरीब आदीवासींच्या कल्याणकारी योजना या सर्वोतोपरीने शेवटच्या आदीवासी कुटुंबा व घटका पर्यंत पहोचवण्यात त्यांनी पर्यंत करतील व त्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा व विश्वास यावेळी सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील यांनी व्यक्त केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button