Yawal

निंभोरा येथे विविध समस्यांच्या नोंदीसाठी एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम संपन्न.

निंभोरा येथे विविध समस्यांच्या नोंदीसाठी एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रम संपन्न.
निंभोरा-सदिप कोळी
येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे “एक तास राष्ट्रवादीसाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,माजी सरपंच डिगंबर चौधरी,श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल ब-हाटे,गुणवंत भंगाळे,रवींद्र भोगे,दत्तात्रय पवार,गिरीश नेहेते,रोशन बोंडे,किरण कोंडे,गौरव कोंडे,राहुल बारी,प्रदीप जंगम, यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच डिगंबर चौधरी व विजय पवार सर यांनी जुना शिंगाडी रस्त्यासाठी पाणंद योजनेतून घेण्यासाठी आग्रह असावा असे सांगितले. तर जिल्हा बँकेजवळील गटार दुरुस्त करण्याबाबत गुणवंत भंगाळे यांनी सुचविले.अनिल ब-हाटे यांनी श्रीराम मंदिराची नोंदणी करण्याबाबत सांगितले असता जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी संवाद साधत धर्मदाय आयुक्त कार्यलयात सोमवारी स्वतः जाऊन त्याचा पाठपुरावा करण्याबाबत आशवस्त केले. दत्तात्रय पवार यांनी संजय गांधी निराधार समिती तालुक्यात गठीत नसल्याने प्रकरणे प्रलंबितNBC n असल्याने या समितीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली.यावेळी स्थानिक विषयांवर ही चर्चा झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button