Parola

पुलाच्या कठड्याला धडक, एकाचा मृत्यू

पुलाच्या कठड्याला धडक, एकाचा मृत्यू

प्रतिनिधी पारोळा – कमलेश चौधरी

आज दिनांक १९/५/२०२० रोजी अमळनेर येथून पाचोरा डॉक्टर विनोद वसंत देशमुख राहणार अमळनेर वय ६५ यांच्या नातेवाइकांकडे जात असताना चालक महेंद्रसरदार व त्याच्या सोबत असलेले दोस्त दीपक राजू भोई वय १७,शुभम संतोष पाटील वय २४ यांच्यासोबत पाचोरा येथे जात असताना महेंद्र सरदार याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पारोळ्याच्या पुढील कामात वाडी फाट्याजवळील नाल्याच्या छोट्या पुलाच्या कठड्याला धडक देऊन गाडीने दोन ते तीन पलटी मारली होंडा कंपनीची मोबिलिया मॉडेल कार क्रमांक एमएच १९सि एफ ४७१९. त्यात चालक महेन्‍द्र सरदार व तिघांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे १०८ नंबर व्हेन ने आणल्यावर डॉक्टरांनी महेंद्र यास मृत घोषित केले. विनोद वसंत देशमुख त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना व शुभम संतोष पाटील व दीपक राजू भोई या तिघांना धुळे येथे हलवण्यात आले दीपक राजू भोई यांच्या फिर्यादी वरून महेंद्र सरदार याच्या विरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button