चिमूर,चंद्रपूर

तळोधी नाईक येथे हर्षोल्हासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक्कावन वी पुण्यतिथी साजरी

तळोधी नाईक येथे हर्षोल्हासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक्कावन वी पुण्यतिथी साजरी

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर तालुक्यातील तळोधी (नाईक) गावाचे वेगळेच वैशिष्ट्य आहे। गुरुदेव सेवा मंडळ तर्फे प्रचंड हर्षोल्हासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक्कावन वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली।संयोजीत कार्यक्रम हा अनोखा आणि वैशिष्ट्य पूर्ण च म्हणता येईल। संपूर्ण गावाची पहाटेला च साफसफाई करून अंगण रस्ते सजविण्यात आले। सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या। चौका चौकात मध्यभागी फुलपाकळ्या नी सुंदर सजावट करण्यात आली। ठरल्या प्रमाणे सोमवारी सकाळी दिनांक अठरा नोव्हेंबर ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी ची गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली। गावातील लोकांचा उत्स्फूर्त उत्साह आणि सहभाग खूप खूप कौतुकास्पद होता। गावातील भजन मंडळ चे महिला आणि पुरुष तालबद्ध सुरात नाचत आणि गात मिरवणूक चे आकर्षक बनले होते। ऐतिहासिक1942 च्या चलेजाव राष्ट्रीय आंदोलना च्या चिमूर येथील झालेल्या क्रांती मध्ये या गावातील सोळा क्रांतिकारकांचा सहभाग होता। तळोधी नाईक या गावात तुकडोजी महाराज दोनदा आणि कर्मयोगी तुकारामदादा तीनदा येऊन गेले होते। त्याची छाप गावात पदोपदी जाणवत होती। गावातून निघालेल्या पालखी आणि मिरवणूक चे रस्त्या रस्त्यावर स्वागत करण्यात आले। पालखीतील सर्व महिलांचे आणि पुरुषांचे कपाळावर अक्षदा लावून रस्त्या रस्त्यावर स्वागत करण्यात आले। प्रत्येक रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पुष्पहार लावलेले फुल आणि फुलपाकळ्या नी सजविलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खुर्चीवर रस्त्याचे मध्यभागी फोटो ठेवण्यात आले होते।

या कार्यक्रमाचे संयोजन साठी सर्वश्री नीलकंठ सूर्यवंशी, रामभाऊ जी वाकडे, मधुकर वांढरे, गोपाळ कावरे, दारूबंदी अध्यक्ष भागवनजी गजभे, बंडूजी गिरी, असंख्य तरुण कार्यकर्ते आणि इतरही सर्व गुरुदेवभक्त आणि गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली। ह प भ नंदीनीताई पाकमोडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय प्राचार्य रवींद्र दादा डोंगरदेव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक सदस्य पुणे, मा गजेंद्र दि चाचरकर संयोजक ग्रामविश्व संघर्ष वाहिनी, दहीकर विद्यालय चे मुख्याध्यापक एम ए गेडाम हे उपस्थित होते। मा सौ पर्वताबाई किंनाके सरपंच तळोधी, जेष्ट कार्यकर्ते माधव वाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष मा शकील शेख, पोलीस पाटील ताई तळोधी, आणि इतर ही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचलन सर्वश्री आशिष कावरे आणि नीलकंठ सूर्यवंशी यांनी केले।

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button