चिमूर,चंद्रपूर

राष्ट्रीय लोकसुर्य पुरस्काराने गुलाबराव श्रीरामे सन्मानित

राष्ट्रीय लोकसुर्य पुरस्काराने गुलाबराव श्रीरामे सन्मानित

चिमूर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके
तालुक्यातील लोहाराचे माजी सरपंच तथा तालुका अध्यक्ष गुलाबराव कैकाडू श्रीरामे यांना नुकतेच राष्ट्रीय लोकसुर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी तसेच धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात असलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन नागपूर येथील जिव्हाळा परिवाराने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
गुलाबराव श्रीरामे यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून तर सरपंच पदाचे उत्कृष्टरित्या कार्यभार सांभाळले. रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाचे तालुका अध्यक्ष, दक्षता समिती सदस्य, महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे तालुका सदस्य, बुद्धिष्ट मिशनचे जिल्हा अध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहे. ते सध्या परिस्थितीत फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत कार्यरत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नागपूर येथील जिव्हाळा परिवाराने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. नागपूर येथील उरवेला कॉलनी, डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हिमाचल प्रदेशचे चाइल्ड वेल्फेअरचे राष्ट्रीय अध्यक्ष बलरामसिंग भादोरिया यांच्या हस्ते गुलाबराव श्रीरामे यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. अवंतिका लेकुरवाळे, मंत्री नितीन राऊत, वरिष्ठ संशोधन अधिकारी अनमोल धाबे, दिनानाथ भंडारी, भारत राऊत, सुरेंद्र बानाइत, प्रवीण आगरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सगळीकडे स्वागत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button