चिमूर,चंद्रपूर

चिमूर शहरात मयतसाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

चिमूर शहरात मयतसाठी जळाऊ
लाकडे उपलब्ध करून देण्याची
शिवसेनेची मागणी

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर नगर परिषद क्षेत्रात वन विभाग कार्यालय असून यात
लाकडे उपलब्ध नसल्याने मयत झालेल्या कुटूंबियांना धावफळ करावी लागत आहे परंतु वन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे वनविभागाने चिमूर येथील वन कार्यालयात मयतसाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे रमेश भिलकर यांनी केली आहे
हिंदू धर्म रिवाजनुसार मयत ही जाळण्यात येते तसेच चिमूर शहर हे जंगलशेजारीच असल्याने लाकडे तुटवडा राहणे ही शोकांतिका असून याबाबत वनविभाग अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्यावर लाकडे उपलब्ध राहत नाही मयत झाल्यास त्या कुटूंबियांना धावफळ करावी लागत असून खडसंगी वरून मयत साठी लाकडे आणावी लागत असून आर्थिक भुरदण्ड गोरगरीब सामान्य जनतेला पडत आहे . वन अधिकारी यांना विचारणा केली असता 3 महिन्यांपूर्वी पासून पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले परंतु वरिष्ठ वन अधिकारी यांनी मात्र लक्ष दिले नाही
वनविभागाने मयत साठी जळाऊ लाकडाचा साठा उपलब्ध करून ठेवण्याची मागणी शिवसेनेचे रमेश भिलकर पिंटू शेट्टे , सचिन खाडे व समस्त शिवसैनिकांनी केली असून या बाबत वन कार्यालयाच्या उदासीन कार्यपद्धतीवर शासनाकडे निवेदन देणार असल्याचे सुद्धा प्रतिनिधी जवळ व्यक्त केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button