चिमूर,चंद्रपूर

चिमूरच्या उमा नदीजवळ देशी दारू पकडली ,ठाणेदार धुळे ची कारवाई

चिमूरच्या उमा नदीजवळ देशी दारू पकडली ,ठाणेदार धुळे ची कारवाई

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर शहरात देशी विदेशी मोहफुल दारू विक्रेत्यांवर अंकुश लावण्यात ठाणेदार स्वप्नील धुळे यश प्राप्त करीत असून अश्यातच चिमूर च्या उमा नदी परिसरात चारचाकी वाहनातून देशी दारू 20 बॉक्स उतरवीत असताना पकडून आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपी पसार झाले.
चिमूर शहरामध्ये होत असलेल्या अवैध दारुविक्रीवर नियंत्रण आणण्याकरिता ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिलेल्या असून सदर सूचनांचे अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता सुमारास चिमूर येथील पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना उमा नदी जवळील स्मशानभूमीत दोन अनोळखी इसम एका स्कार्पिओ वाहनामधून दारू उतरवीत आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता एकूण 20 बॉक्स मध्ये प्रत्येकी 48 नग याप्रमाणे एकूण 960 बॉटल्स किंमत 1,92,000 /- तसेच एक स्कार्पिओ गाडी क्रमांक MH 33 A 3499 किंमत 8,00000 /- असा एकूण 9,92,000/- रुपये मुद्देमाल मिळून आला. आरोपी इसम हे घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाले असून वाहन चालक व मालकविरुद्ध गुन्हा नोंदवून चिमूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सदरची कारवाही पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रेजिवाड, पोलीस हवालदार विलास निमगडे, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, प्रवीण गोन्नाडे, सैनिक गायकवाड, नेटिनकर, श्रीरामे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button