चिमूर,चंद्रपूर

चिमुरात श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित

चिमुरात श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित

चिमूर, प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

श्री संत नगाजी महाराज सेवा समिती, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सलून संघटना चिमूर चे वतीने दिनांक २३ व २४ डिसेंम्बर रोजी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र माणिक नगर (पावशी आंबा,) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सेवा समितीचे अध्यक्ष देवेंद्र उद्धवराव कडवे यांनी दिली.
दिनांक २३ डिसेंम्बसर रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीक्षेत्र पारडीचे हभप नारायणराव कडुकर महाराज व सेवा समितीचे सचिव अरुण चिंचुलकर यांचे हस्ते विधिवत घट स्थापना केल्या नंतर रात्री ९ वाजता श्री गुरुरुदेव सेवा भजन मंडळ वडाळा (पैकू) ,नवयुक जयश्रीराम भजन मंडळ चिमूर, श्री गुरुदेव कवडशी(रोडी) यांचा भजन जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक २४ डिसेंम्बर रोजी सकाळी ७ वाजता श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हभप नारायणरावजी कडुकर महाराज यांचे हस्ते झाल्यानंतर सुगम संगीत व भजन कार्यक्रमाचे नियोजनाचे आयोजन करण्यात आले असुन दुपारी १२ वाजता हभप बबनराव दापोरीकर महाराज यांचे कीर्तन समाजप्रभोनात्मक कीर्तन झाल्यानंतर श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेसह भव्य शोभायात्रा चिमूर शहरात काढण्यात येणार आहे, सायंकाळी ५ वाजता चिमूर शहरातून व विदर्भातून उपस्थित भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या भव्य-दिव्य कार्यक्रमात सहभागी व सहकार्य करण्याचे आवाहन सेवासमितीचे अध्यक्ष देवेंद्र कडवे, उपाध्यक्ष प्रा. गजानन बन्सोड, सचिव अरुण चिंचुलकर, सहसचिव दिवाकर पुंड, कोषाध्यक्ष रामभाऊ खडशिंगे, सदस्य रामदास मांडवकर, नीलकंठ जमदाळे,रमेश मेंधूलकर,शेखर एकोणकर, अंकुश पुंड, महादेव सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे चिमूर शाखा अध्यक्ष श्रावण कडवे, उपाध्यक्ष भास्करराव चन्ने, विनोद चांदेकर, सुधाकर पुंड, राजू राजूरकर, मनोहर सूर्यवंशी, दुर्योधन लाखे, संभाजी पारधी, रामदास जांभुळे,खेमराज चौधरी, लुटारू सुर्यवंशी, उद्धवराव कडवे, मोतीराम लाखे, सुधीर पंदिलवार,नामदेवराव कडवे यांनी आवाहन केले आहे.
श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात सलून संघटनेचे अध्यक्ष संजय लाखे ,उपाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, सुरज पुंड, श्रावण कडवे ,जितेंद्र चिंचुलकर ,प्रफुल्ल चन्ने, राजेंद्र सूर्यवंशी, अतुल मेश्राम, सुखदेव कडवे, प्रमोद बारसागडे, गिरीधर किरीमकर, मंगेश कावळे, विशाल सूर्यवंशी, सुनील कडवे, अनिल कडवे, रामेश्वर पुंड, विजय पायलिंमोडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जबाबदारी स्वीकारली आहे ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button